आम्ही नाही गिर्यारोहक तरीही चढतो पर्वत एका उडीत,
आम्ही नाही सुरेल गायक तरी गातो गाणे एका दमात,
आम्ही नाही जरीही माळी, तरीही बाग आमची सदाफुली,
आम्ही नाही जरी सुगरण तरीही सुग्रास आमची थाळी,
आम्ही नाही जरी कामसू तरी हात आमचे नेहमी तयार,
आम्ही नाही जरी भित्री भागू तरीही घाबरतो सावल्यांस,
आम्ही नाही जरी कोणी शिक्षक तरी शिकवतो आयुष्याचे धडे,
आम्ही नाही जरी कुठला नायक तरीही पात्र आमचे खरे खुरे..
आम्ही नाही जरी दूरदर्शी तरी नजर आमची काजव्यावारती,
आम्ही नाही प्रवासी देशोदेशीचे तरी ओळख साऱ्या प्रांताची..
आम्ही गेलो नाही कुठे जरी मन आमचे न जागेवारती,
आम्ही असलो कुठल्याहि जमिनीवरती तरी इच्छा आकाशाच्या वरती..
आम्ही असो कुठेही, कोणासोबत, स्वप्न आमचे सदा भिरभिरती..
आम्ही शब्दाचे सोबती, शब्दच विकतो आणि शब्दच खातो..शब्दाचे मनोरे रचतो, शब्दांसोबत वाहतो, शब्दांना वाहवतो...
हे शब्दच नेती दर्यावरती, आकाशाशी भेट घडविती,
हिमालयाशी साद घालिती,
अन आम्हा भुलविती..
आम्ही नाही कवी, नाही लेखक, नाही कोणी साहित्यिक,
आम्ही शब्दांचे सोबती, शब्द आम्हा पारखती, आणि शब्दांशीच आमच्या ओळखी...
khupch chhan!!
ReplyDelete@ Ajay - धन्यवाद !!
ReplyDelete