Thursday, February 23, 2012

चांदणं - ४

ती झाडाखाली बसलेली असते. 

कॉलेज भरायला अजून बराच वेळ असतो आणि अशावेळी त्या झाडाखाली बसून घोळक्याकडे बघून तिला तिच्या डायरीची पण भरवायला जाम मजा येते. अशीच नेहमीप्रमाणे ती त्या झाडाखाली बसलेली असते.
तो तिथून लांब असलेल्या कट्ट्यावरून तिला निरखत बसलेला असतो. तीच मग्न होवून डायरीमध्ये लिहिण तो न्याहाळत असतो. तसा लिहायचा नाद त्यालाही होताच, पण तिच्या इतका तो खोल कधी लिहायचा नाही. किंबहुना त्याच लेखन म्हणजे विडंबन कविता, फुटकळ विनोदी कथा यापलीकडे जायचं नाही. पण जेव्हापासून त्याने तिला ऐकल होत ना तेव्हापासून त्याला तीच लेखन म्हणजे खूपच भावलं होत. 
त्याला तिला भेटून बोलायचं होत पण हिम्मतच होत नव्हती. 
तिने चार पाच डायरीची पान भरवली होती एव्हाना. तिच्या मैत्रिणी आल्या तशी ती आवरून निघाली.  त्याचा आणि तिचा वर्ग वेगळा होता. तो पडला कॉमर्स चा विद्यार्थी आणि ती आर्टस ची.
त्याची आणि तिची पहिल्यांदा ओळख झाली ती पुरस्कार वितरण सोहळ्याला. बारावीचा निकाल लागला. ती कॉलेजमध्ये ७ वी आली होती. त्याला जेमतेम फर्स्ट क्लास मिळाला होता. त्या समारंभात त्याने धीर करून तिला जावून अभिनंदन केले होते. तेव्हा त्या दोघांची पहिली ओळख आणि भेट. तिने हसून त्याला प्रतिसाद दिला. पुढे काय करणार वगैरे थोडीफार बोलणी झाली आणि अशाप्रकारे त्या भेटीची सांगता झाली. पुढे भेटू केव्हातरी म्हणून एक आश्वासनही देईल गेल. पण ती भेट होण्याची काहीच शाश्वती नव्हती.
पुढे त्याने बी. कॉम. ला अडमिशन घेतलं. बी. कॉम च्या शेवटच्या वर्षाला असताना तो आणि त्याची मैत्रीण आभा यांची फार चं मैत्री जुळली होती. तो, आभा, भूश्या, संजय, श्रेयू आणि अगस्ती. धम्माल मजा करायचे. त्याच लेखन तर आताशा पूर्ण बंदच होत. पण तेव्हा पुरुषोत्तमच जाहिराती भिंतीवर लागल्या. तो आणि त्याच्या मित्र मंडळीनी पुरुशोत्तामचा घाट घातला. 
झाल त्यांची तयारी सुरु झाली. स्क्रिप्ट लिहायचं काम संजय कडे, डायलॉग लिहायचं काम त्याच्याकडे. कारण अजून कोणाला माहितीच नव्हत कि तो कधीतरी कथा-कविता लिहित होता ते आणि त्याने कोणाला काही संगीतालाही नव्हत. पण जेव्हा त्यांची कथा तयार झाली आणि संजय ने ती सर्वाना ऐकवली तेव्हा ती कोणाच्या मनाला टच होत नव्हती. काहीतरी गडबड होती पण कोणालाच कळेना. 
कथा होती कृष्णावर. पण त्यातला तोच तोचपणा लग्गेच जाणवत होता.
कथा कशी असावी यावर आता सर्वांची चर्चा होणार होती. सर्व जण जमले.
आभा - "स्टोरी अशी पाहिजे ना कि त्यामुळे प्रेक्षक एका वेगळ्याच वातावरणामध्ये जातील. आणि आपली सध्याची हि गोष्ट म्हणजे एकदम कॉमन आहे रे भूश्या . संजू तू काहीतरी वेगळ लिही ना जरा."
श्रेयू - "माझ्याकडे एक कल्पना आहे. अगस्ती ला तर मुझिक येत. आपण कृष्णाची मुझीकाल स्टोरी करूयात का? "
आभा - "अये यार नाही बर का. यात काही मजा नाहीये "
संजू - "ठीक आहे. मलाही कळतंय कि काहीतरी वेगळ करायचं. पण मला काहीतरी हिंट द्या ना राव तुम्ही लोक."
आभा - "आरे तू लेखक आहेस, आम्ही तुला काय हिंट देणार?"
अगस्ती - "मुझीकाल स्टोरी ची कल्पना तशी छान आहे. आपण मध्ये मध्ये कविता पण टाकू शकतो."
आणि अगस्तीच्या कविता या शब्दामुळे त्याला काहीतरी सुचत. पुढे काहीतरी चर्चा वाढून दुसर्या दिवशी पुन्हा उर्वरित चर्चा पुढे नेण्यासाठी भेटायचं ठरत.

तो घरी जातो. गेल्या गेल्या त्याच्या जुन्या डायर्या शोधतो. खूप शोध-शोध केल्यावर त्याला ते कवितेच पान भेटत. जेव्हा अगस्ती कविता टाकायची असा बोलतो, त्यावेळी त्याला तिच्या त्या पहिल्या कवितेही आठवण होते. आणि त्याच्या डोक्यामध्ये कहाणी फिक्स होते. घरी येवून तो तिचीच ती कविता शोधतो आणि त्याला सापडतेसुद्धा. 
तो स्टोरी लिहायला बसतो. स्टोरी आता कृष्णावर नाही तर राधेवर तो लिहिणार असतो.
४-५ तास पान खाराद्ल्यावर त्याच्या मनासारखी स्टोरी तयार होते. आणि तिची ती कविता तो त्यामध्ये टाकतो.
दुसर्या दिवशी त्याची ती नवीन स्टोरी सर्वाना इतकी आवडते कि पात्र, डायलॉग, स्टेज डेकॉर, कॉस्चुम सर्व काही फटाफट ठरून जात. श्रेयू राधेच पात्र साकारणार असते. त्यामध्ये एक खूप छान कन्सेप्ट त्याने टाकलेली असते ती म्हणजे - राधेची सावली. राधेच्या सावलीच पात्र अर्थात आभा करणार असते. सर्वाना ती कविताही खूपच आवडते. पण तो कोणाला सांगत नाही कि ती कविता त्याची नसते. 
झाल. सर्व तयारी होते. आणि स्पर्धेचा तो दिवस उजाडतो. त्यांचा नंबर सतरावा असतो. त्यांचा नंबर येतो. नाटक सादर करण्यापूर्वी, निवेदनामध्ये तो स्टोरी बद्दल थोडफार सांगतो -
"हि कथा आमच्या मनाला भावली म्हणून आम्ही इथे सादर करत आहोत. इथे आम्ही 'राधा' साकारणार आहोत. पण हि राधा काही कृष्णाची राधा नाहीये. हि राधा म्हणजे प्रत्तेक स्त्रीच्या मनातली आकृती आहे. इथे कुठेच कृष्ण नाहीये. का नाहीये? तर आपण नेहमीच राधेबद्दल बोलतो तेव्हा ती कृष्णाची राधा म्हणूनच बोलतो. किंवा तिच्या आयुष्यात कृष्णाशिवाय दुसरं काही नाहीये असाच आपण बोलतो. पण आज जी राधा आम्ही इथे सादर करत आहोत ती पूर्णपणे कृष्णाशिवाय. तिला तीच स्वतंत्र अस्तित्व आहे विचार आहेत, स्वप्न आहेत. हि राधा कदाचित पूर्वीच्या राधेशी मिळती जुळती नसेल. पण हि 'राधा' हि आजच्या प्रत्तेक स्त्रीच एक प्रतिबिंब असेल. आम्ही नाटकामध्ये एक कविता ऐकवणार आहोत. त्याबद्दल मला आधीच खुलासा करावासा वाटत आहे. ती कविता माझ्या बारावीच्या एका मैत्रिणीची आहे. आणि तिच्या परवानगीशिवाय आम्ही हि कविता इथे सादर केली आहे कारण तिच्याशी मला संपर्क साधता आला नाही. त्यामुळे तिची माफी मागून मी हे नाटक इथे सादर करत आहे. धन्यवाद."
नाटक संपले. टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट झाला. तो आणि त्याचे मित्र या प्रतिसादाने भारावून गेले. पडद्यामागे सर्व जण आपला मेक-अप आवरत असताना तिथे एक मुलगी आली आणि त्याच्याबद्दल विचारू लागली.
"तो आदित्य आहेत का इथे." 
श्रेयू - "नाही तो रेपोर्ट करायला गेला आहे. येईलच इतक्यात. तू?"
ती - "मी त्याची मैत्रीण आहे - जानव्ही. तुम्ही आदित्यला सांगा कि मी इकडेच आहे. आमचा नाटक सुरु व्हायला अगदी थोडाच वेळ आहे. तर मी आत्ता जाते. मी नंतर भेटेन नक्की."
श्रेयू - "ठीक आहे."
आणि ती लगबग करत निघूनही जाते.
तीच नाटक होवून जात. त्याच नाटक होत. श्रेयू गडबडीत तिचा निरोप त्याला सांगायचं विसरून जाते.
त्याला आणि त्याच्या ग्रुप ला ४ थ्या नंबरच बक्षीस मिळत. सर्व जण खूप खुश होतात. एकाच जल्लोष होतो.
तो आनंद साजरा करण्यासाठी ते सारसबागेमध्ये जमले. तिथे भेळ, रगडा खावून झाल्यावर त्यांचा घोळका बागेमध्ये विसावतो. तिथे त्या कवितेचा विषय निघतो.
आभा - "या कवितेबद्दल तू काही बोलला नाहीस आधी. आणि अजून एक गोष्ट, गडबडीमध्ये म्हणा किंवा या नाटकाच्या नादात एक गोष्ट मी बोलायचे विसरूनच गेले. तू खूप छान लिहितोस. आणि  आम्हाला आत्तापर्यंत कधी समजलाच नाही."
सर्व - "हो हो. हा आदी एकदम छुपा रुस्तम निघाला. खूपच भारी स्टोरी होती तुझी. आणि ती कवितेची भानगड काय आहे काय."
एवढ्यात श्रेयूला ती मुलगी आठवली.
श्रेयू - "ए आद्या, अरे एक पोरगी तुला भेटायला आली होती तिथे. ते नाटकाच्या गडबडीत मी सांगायचं विसरले. काय बर तीच नाव. हा जान्हवी. हो हेच नाव होत."
आदित्य - "जान्हवी ??? ती आली होती. कधी कुठे???" 
श्रेयू - "आपल नाटक झाल्यावर, आपण जेव्हा सर्व जण स्टेज च्या मागे होतो ना रूम मध्ये. तेव्हा ती आली होती. तू रेपोर्ट करायला गेला होतास तेव्हा. तिच्या कॉलेजच नाटक होत म्हणून ती गडबडीत निघूनही गेली."
आदित्य - "आर्रे यार, तीच माझ्या कवितेची लेखिका. जान्हवी. म्हणजे ज्या कवितेबद्दल मी बोललो होतो ती कविता माझ्या एका बारावीच्या मैत्रिणीने लिहिलेली आहे. नाटकामध्ये ती कविता घेण्याआधी मी तिचा म्हणजे - जान्हवीचा पत्ता शोधायचा प्रयत्न केला होता. पण माझा आणि तिचा काही संपर्क झाला नव्हता. आणि कोणाची कविता मला चोरून वापरायची नव्हती. म्हणून निवेदनामध्ये मी त्याबद्दल कल्पना दिली. पण तिची भेट मात्र हुकली."


* * *
पावसाची एक सर,
दवाचा एक बिंदू,
तशीच एक आठवण तुझी.
अलगद आणि हळुवार
अगदी तुझ्या कवितेसारखी.


Sunday, February 12, 2012

गोष्ट एका गोव्याची

'दिल चाहता है' पिक्चर रिलीज झाला होता तेव्हा दोन गोष्टी त्यांच्या नसानसात भिनल्या होत्या. त्यातली एक म्हणजे गोव्याची ट्रीप आणि दुसरी म्हणजे आमीर खानच आणि त्याच्या मित्राचं जेव्हा भांडण होत तेव्हा अमीर खान ऐकत असलेल गाणं (Desert  Rose by Sting ). त्यांचा ग्रुप कट्ट्यावर बसल्यावर हमखास ट्रीप चा विषय निघायचा आणि त्यामध्ये बीच वरच्या ट्रीप ला नेहमी प्राधान्य असायचं. आणि आपण आपल्या आई पप्पांना कस गंडवून ट्रीप ला जावू शकतो ह्याचे जास्ती प्लान ठरायचे. चार - पाच वर्ष झाली फक्त ठरवा ठरवीच सुरु होती आणि त्या प्लान ला मूर्त स्वरूप मिळायचे चान्स दिसू लागले. नशिबाने आई पप्पांना गंडवायची गरज भासली नाही कोणाला. पण कुठे ना कुठे फिरकी टाकावीच लागणार होती. आणि ती त्यांनी एकदम यशस्वीरीत्या टाकली होती. सर्व जण न पिताच एकदम सातव्या आस्मानावर कि काय म्हणतात ना तिथे होते. आणि खर तर त्यांना नशा येण्यासाठी असल्या खम्ब्यांची नाही तर मित्रांची गरज होती. एकदा ते सर्व जण एकत्र आले कि मग आधी हशा आणि मग त्या हर्षासुराची नशा. बाकी बाह्य गोष्टी म्हणजे क्षुल्लक होत्या. अजून एक त्यांचा नियम होता - "अभी नही तो कभी नही ." त्यामुळे मनात आल ते केल नही तर त्यांना अपचनाचा त्रास होतो. म्हणजे त्यापुढे जे काही होत ते त्यांना बिलकुल पचत नाही. तर अशा प्रकारे मजल दर मजल करत ५ वर्षांनंतर त्यांच्या त्या प्लान ला मूर्त स्वरूप आले होते.
* * *
त्यांचे पावलांचे तळवे त्या खाऱ्या पाण्यामध्ये भिजले आणि बऱ्याच वर्षांच्या तपस्येच फळ मिळाल्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये एक शांतात भरून आली. तो समुद्र सुद्धा त्यांच्या भेटीच्या स्पर्शाने एकदम शांत झाल्यासारखा मंद मंद लाटा किनाऱ्यावर सोडत होता. खूप आनंद किंवा संधान मिळाल्यावर त्यापुढे फक्त शांतता असते हेच भासत होत.
ती कुठल्यातरी लेखकाची शाळेत शिकलेली कविता त्यांच्यातल्या एका कार्टूनच्या  डोक्यात नक्कीच घुमली असेल - 
"माझ्या गोव्याच्या भूमीत
 गड्या नारळ मधाचे "..
त्या उनाड डोक्यांमध्ये आता हळू हळू वारे शिरत होते, एक भन्नाट वारे. 
४ दिवस बिनधास्त जगायचे, वाऱ्यावर उडायचे, लाटांवर तरंगायचे, आयुष्याला स्पर्श करतील आणि कोणत्याही दुखामध्ये हसवतील-धीर देतील अशा आठवणी जमा करायचे... 

* * *
त्यांचा घोळका त्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असणाऱ्या किल्ल्यावर मस्ती घालत होता. सूर्यास्ताचे भरपूर फोटो काढून झाले. सूर्य मावळला, आणि सगळीकडे एक जांभळी-गुलाबी-नारंगी झाक पसरली. निसर्ग हळू हळू अंधाराकडे चालू लागला होता. त्या उंच किल्ल्यावरून समुद्राचे पूर्ण दर्शन होत होते. दूर क्षितिजाच्या जवळ तपकिरी रंगाची उधळण करून तो भास्कर त्याच्या घरी निघून गेला होता. त्यांचा घोळका त्या किल्ल्यांच्या कड्यावर बसून हे डोळ्यात आणि मनामध्ये साठवण्याचा प्रयत्न करत होता. 
अंधार नेहमी वाईट वाटायचा, पण अंधाराकडचे मार्गक्रमण इतके सुरेख असू शकेल असे वाटले नव्हते. कदाचित हि पूर्णत्वाचे रंग आपल्याला याच वेळी अनुभवता येतात. हे रंग दिवसभरात कोणत्याच प्रहरी दिसणार नाहीत, पण या सांजवेळीच त्यांचा खेळ रंगलेला असतो.
जसा तो सूर्योदय असंख्य आनंदाचे किरण घेवून येतो, उत्साहाचे वातावरण घेवून येतो; अगदी तसेच हा सूर्यास्तदेखील एक वेगळीच शांतात आणतो. पूर्णत्वाची शांतता. तो जांभळा रंग कदाचित सूर्योदय कधीच आणू शकणार नाही.

पण यातली एकही गोष्ट त्या उनाड टाळक्या मध्ये आली नाही. असं म्हणतात कि आपण आनंदात असेल तेव्हा आपल्याला असं काही feel होत नाही. feel होण्यासाठी थोड तरी दुख लागत. 
आणि त्यांच्या डोक्यात तर फक्त वार भरलं होत - आनंदाच वारं.