Tuesday, June 5, 2012

चांदणं - ६

आदित्य अवाक होवून जान्हवीच काम बघत राहिला आणि नाटक कधी संपलं याचा पत्तापण लागला नाही त्याला. नाटक झाल्या झाल्या तो पळतच जान्हवीच्या रूम कडे जायला निघाला. संजय ला ५ मिनिटात येतो म्हणून आदित्य जान्हवीला शोधात निघाला खरा पण वाटेत त्याला अभाच भेटली. आभा शी एक दोन शब्द बोलून ती काय बोलते आहे याकडे लक्ष न देता त्याने तिलाच विचारलं, " अग ती तुझी मुख्य नायिका कुठे आहे. तीच माझी बारावीची मैत्रीण. आपल नाटक झाल होत न, त्यामध्ये मी ती कविता घेतली होती त्या कवितेची लेखिका." अभाने प्रश्नांचा भडीमार करायच्या आधीच आदित्य ने सारा निबंध सुनावला. अभाने त्या कोपऱ्यातल्या खोलीकडे बोट केल आणि समोर बघते तो तो कधीच त्या रूम कडे झेपावला होता. आदित्य ला तिने इतका आसुसलेलं कधी पाहिलं नव्हता, पण जास्ती विचार न करता ती तिच्या रूम मध्ये आवरायला गेली.
आदित्य ने रूम च दार ठोठावल. जान्हवीने आतूनच कोण आहे, आत या म्हणून सांगितलं. 
तो आत गेला, जान्हवीने आरशातूनच आदित्य कडे पाहून एक मोठ्ठ स्मित केल आणि त्याला बोलायला वळली तेवढ्यात वळताना तिचा धक्का लागून तिथला काचेचा flower pot पडला. आणि ती हसायलाच लागली. आदित्य ला कळेना कि काय झाल नेमक, पण तिला हसताना पाहून त्याच्या मनात सहजच ओळी स्फुरल्या,

"आज अचानक मला कळेना,
उदय कुणाचा- सूर्याचा कि तुझा 
रात्र कोणाची चंद्राची कि तुझी 
मग तुझ्याच ठिकाणी उषःकाल अन 
कसा चांदण्यांचा पसारा ?
पावूस कोणाचा ढगाचा कि तुझा
पण तुझ्याच ओठी गडगडात सारा .. "

एकदम जान्हवीच्या आवाजाने तो जागेवर आला, "आरे सॉरी हं, माझ्याकडून हे नेहमीच घडत. मी आत्तापर्यंत शंभर एक flower pot तरी फोडले असतील, तरी मी सरांना सांगितलं होत कि माझ्या रूम मध्ये तुम्ही ते फुलांना कोंडून नका ठेवत जावू."
इतक बोलेपर्यंत आदित्य त्याच्या कवितेच्या विश्वातून पूर्ण बाहेर आला होता. आणि एकदम ओशाळून पण गेला होता, कारण जान्हवी कडून एकदम असा मोकळेपण त्याला अपेक्षित नव्हतं. 
तिची बडबड मात्र चालूच होती. 
"हो पण आदित्य राव , तुम्ही माझी कविता चोरली याबद्दल तुम्हाला शिक्षा तर झालीच पाहिजे. "
आदित्य एकदम गडबडून गेला आणि बोलू लागला - "अग मी त्यावेळी नाटक सुरु व्हायच्या आधी मुद्दामूनच प्रस्तावनेत सांगितलं होत तसं. पण तुला वाईट वाटल असेल तर मी .."
त्याच वाक्य मधेच तोडून ती लग्गेच बोलली "हो मला वाईट तर खूपच वाटलाय आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून तू पुढच्यावेळी येताना माझ्यासाठी चोकलेट चा मोठा बॉक्स आणि फोडायला एक flower pot घेवून ये ."
"पुढच्या वेळी ??" आदित्य एकदम बोलला. 
"का ?? आपण आता इथेच बाय करणारे का? आता आपण भेटत राहणारे. आणि हो तुझा फोन नंबर पण दे मला."
"घ्या जान्हवी बाई इथेच आहेत अजून. आम्ही मात्र पूर्ण गाव शोधून आलो. आणि तू इथे काय करतीयेस." इति अक्षय जान्हवीचा सहकलाकार आणि मित्रसुद्धा.
"अरे अक्षु हा आदित्य माझा बारावीचा मित्र. म्हणायला मित्र आत्ताचा जेव्हा त्याने माझी कविता चोरली तेव्हापासूनच. कारण कॉलेजमध्ये कधी आम्ही बोललोही नाही."
"आरे हाय आदित्य आणि please तू जानू कडे लक्ष देवू नकोस ती अशीच खेचत असते सर्वांची. खर तर तुझ्या त्या नाटकामध्ये तिची कविता ऐकून ती अशी वेड्यासारखी पळत सुटली होती स्टेज कडे. ती एकदम शोक झाली होती कि ती कविता तिला सापडली म्हणून."
"सापडली ??? म्हणजे ?", आदित्य.
"अरे तुला तिने सांगितलं नाही का अजून? तिच्या कविता संग्रहामध्ये ती कविताच तिला सापडत नव्हती."
"आरे अक्षय तो त्यानंतर आत्ता मला भेटलाय. पण अरे हो मी विसरलेच आदित्य तू कसा काय नाटक पाहायला? तुला नाटकांची आवड आहे का?"
"अग तुझ्यासोबत काम करते न ती आभा, ती माझी मैत्रीण आहे. आज तिच्यासाठी आम्ही आलो होतो आणि .."
"आणि काय ?", जान्हवी.
"अरे हो मी विसरलोच. मला आता लवकर गेल पाहिजे, कारण आज आम्ही कॉलेजची मित्रमंडळी खूप दिवसांनी एकत्र भेटलो आहोत आणि आम्ही आभा सोबत बाहेर जायचा प्लान केलाय. त्यामुळे मी आता निघतो." हे बोलता बोलताच तो रूम मधून बाहेर पडतो.
"ठीक आहे, पण भेट नक्की. बाय." जान्हवी.
"बाय जान्हवी आणि अक्षय तुलापण बाय."

त्यानंतर त्यादिवशी सर्व जणांनी खूप दिवसानंतर धम्माल केली. सर्व जनाच खूप खुश होते. एकटी आभा सोडून, तिला आदित्य ने जान्हवीला असा इतका वेळ जावून भेटलेल मुळीच आवडलं नव्हत. 
' आदित्य माझ्यासाठी आला होता न नाटक पाहायला मग तो इतका वेळ असा का तिच्याबरोबर गप्पा मारत होता कोणास ठावूक." हाच विचार पूर्ण वेळ आभा करत होती. पण नंतर मजा करता करता तीसुद्धा हे विसरली.

नंतर बरेच दिवस  आणि सर्वच जन आपल्या कामामध्ये बिझी होती. इतके कि कोणाचा कोणाला पत्ता नव्हता.
श्रेयू ला एका कंपनीत चांगला जॉब मिळाला होता, ती आता पार्ट टाइम कॉलेज करत होती. परीक्षेपुर्तच कॉलेजला जायचं होत तिला. 
संजय ला दिल्लीच्या एका विद्यापीठाचा कॉल आला होता सायाकोलोजी मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी, त्यामुळे तो तिकडे जायची तयारी करत होता.
अगस्ती च्या पी एच डी च पाहिलंच वर्ष होत, पण तो खूपच नेटाने अभ्यास करत होता. त्याला ऑस्ट्रेलियामधून तिथे त्याच पी एच डी पूर्ण करण्यावाषयी विचारणा झाली होती.
आदित्य मात्र मागे पडत होता. CA च्या पहिल्या परीक्षेमध्ये नापास झाला होता. अभासुद्धा मुंबई ला शिफ्ट झाली होती, आताशा तिला मराठी हिंदी मालिकेमध्ये काम करण्याविषयी विचारणा झाली होती आणि एका मराठी मालिकेमध्ये ती कामही करू लागली होती. तिने नाटक कारण सोडून दिल होत. पण ती महिन्याचा एका रविवारी खास आदित्य ला भेटण्यासाठी घरी येवून जायची. हल्ली तिला आदित्य बद्दल वेगळ फिलिंग येत होत. तिलाच काळात नव्हत, पण तो आता मित्रापेक्षाही जास्त कोणीतरी बनू लागला होता. आदित्य मात्र त्याच्या अपयशामुळे सर्वांपासून दूर राहू लागला होता. 
आदित्य ने आता नोकरी शोधायला चालू केल होत. 
पावसाळा सुरु झाला होता. एके दिवशी असाच क्लास वरून रात्री उशिरा येताना आदित्य बस स्टोप वर थांबला होता. एकदमच पावसाला सुरुवात झाली, आधी रिमझिम आणि दहा पंधरा मिनिटातच धो धो पडायला लागला होता. तेवढ्यात दूरवरून कोणीतरी पळत पळत स्टोप कडे येताना त्याला दिसलं. आदित्य पूर्ण भिजला होता पण बस येवूपर्यंत त्याच्याकडे दुसरा पर्यायाच नव्हता.
ती पळत येणारी व्यक्ती आता दृष्टीक्षेपामध्ये आली होती. आणि आदित्यने चमकून पाहिलं तर ती जान्हवीच होती. 
ती आली स्टोप वर आणि स्टोप च्या एका कोपऱ्यात आडोशाला उभी राहिली. तीच लक्ष नव्हता आदित्य कडे. स्टोप वर अजून एक दोन जन होते. 
आदित्य तिच्या जवळ जावून थांबला आणि बोलला " सॉरी मी चोकलेट आणि flower pot नाही आणलाय. " आणि जान्हवीने आश्चर्य भरल्या नजरेने शेजारी पाहिलं.
दोघेही एकदमच बोलले " कुठे आहेस तू ??"
जान्हवीने हात करून आदित्य ला थांबवलं आणि तिने बोलायला सुरु केल , "आरे काय हे कुठे होतास इतके दिवस. मी नाटक सोडलं आणि त्यामुळे अभाकडून तुझा पत्ता घ्यायचा सुद्धा राहिला. तू तेव्हा फोन नंबर द्यायाचाही विसरून गेलास. .."
आणि आदित्य ला कळलं कि आता हिची बडबड काही थांबणारी नाहीये. आणि त्याला ती थांबू नये असंही वाटू लागल. कारण त्या दिवशी त्याने चार पाच ठिकाणी नोकरी साठी interview दिले होते सगळीकडे निराशा होती. आणि मग त्यामुळे त्याच लक्ष क्लास मधेही लागत नव्हत. आणि त्याला जान्हवी दिसली इथे, त्याला इतकं बर वाटल कि बस्स तिची बडबड ऐकत राहावी. 
आणि जान्हवी होतीच तशी. बडबडी.
त्या पावसामध्ये आदित्यला पुन्हा काही ओळी सुचल्या -
"मुसळधार पावूस आहे कि हिची बडबड
मलाच उमजेना,
ठाव मनीचा घेत 
तिचे शब्द मनातून परत फिरेना,
"
आणि आदित्य एकदम थबकला. कारण त्याला जाणवलं कि जान्हवी जेव्हा जेव्हा समोर येते तेव्हा तेव्हा तिच्यासोबत ती हि कविता आणि कवितेचे शद्बही घेवून येते.

एव्हाना पाऊस निवळला होता. रस्त्यावरच्या दिव्यात ते रात्रीचे रंग सुरेख दिसत होते. रस्त्यावरचे दिवे जणु पावसात धुतले गेल्यामुळे अजून शुभ्र प्रकाश फेकत होते.

1 comment:

  1. मनास स्पर्शून गेली हि कथा

    ReplyDelete