"ती पुनः भेटली मला. वर्षानु वर्षांपूर्वी ती मला मीरा म्हणून भेटली होती. आणि त्याही आधी युगांपूर्वी राधा म्हणून. आणि आता ती वेडी पुनः भेटली. राधे इतकी आतुर नक्कीच नाही, ना मीरेइतकी थोरही नाही ती. पण तीच गोड हसू मात्र तसंच आहे. यमुनेच्या प्रवाहासारख. एकदा आली होती द्वारकेला, आणि तीच वेड मलाही देवून गेली. तेव्हापासून तिच्याविना काही सुचेना. खरतर त्या आधीच कधीतरी तिने मला तिच्या आयुष्याच सारथ्य दिलेलं होत, तिच्या स्वताच्याही नकळत. "
"मी एक पती झालो, भ्राता झालो, सखा बनलो, मित्र बनलो, पुत्र बनलो, मार्गदर्शक बनलो, सारथी झालो, वडील झालो, माझ्या राज्याला सांभाळायचे होते मला - एक राजाही होतो ना मी. सर्वांकडून आयुष्यभर प्रेम गोळा केले. माझ्या चुकानाही प्रजेने 'लीला' म्हणून पदरात घेतले. जे काही आधीच होते, तेच मी सर्वाना वाटल्याबद्दल मला खूप उच्च स्थान दिले. पण यात मी माझे स्वताचे काही केले नाही. जे काही होते ते इथेच होते आधीपासून, मी फक्त मार्ग दाखवला. म्हणून मला 'देव' संबोधले. पण या सर्वांमध्ये नक्कीच थोर राधा होती. तिने तर तिच्या जवळचे सर्वस्व दिले आणि त्यापलीकडेही जावून देत राहिली. माझ्याजवळ करण्यासारखे भरपूर होते, मी संसारात पूर्ण गुरफटून गेलो पण राधेजवळ तर फक्त माझ्या आठवणी होत्या, मीसुद्धा नव्हतो. पण त्या देवीने कधीच खंत म्हणून कशाची बाळगली नाही. नंतर आली ती 'मीरा' ! ती आली अन सारा आसमंत तिच्या ओवीनी उजळून गेला. तिची थोरता तर मलाही भारावून गेली. कधीकधी वाटत कि मी स्वतः बनून राधेला जवळ केल असतं, मीरेला आपल्या गाठी बांधल असतं तर खूप बर वाटल असत मलाही. "
"पण म्हणूनच कि काय ती वेडी पुनः भेटली मला. तिच्या ठायी मोह आहे, इच्छा आहेत , आकांक्षा आहेत. पण मला बोलते कशी, 'कृष्णा तूच सांग बर. जर मला मोह नसता तर तुझा मोह कसा धरला असता. मी स्वार्थी नसते तर स्वताच्या स्वार्थासाठी मी तुझ्यावर प्रेम कसे केले असते.' असे प्रश्न तिने विचारला सुरुवात केली कि मग माझी उत्तरे संपतात. आणि मग ती गोड हसू लागते. मग सारी सृष्टी या नारीच्या त्या हास्यापुढे फिकी पडते. मग वाटते कि प्रत्तेक प्रियकराने आपल्या प्रेयसीला असंच हसू दिल, एखाद्या पतीने त्याच्या रुक्मीणीला असंच सुखी केल तर माझ राधेला एकट टाकल्याच दुख थोड कमी होईल."
"मी तिला माझी गीता ऐकवायला गेलो एकदा तिला 'कोणत्या गोष्टीचा मोह धरू नये, मोहाने आपण संसारात अडकत जातो. फळाची अपेक्षा ना करता कर्म करत रहावे. सृष्टीतल्या सर्व गोष्टी अशाश्वत स्वरुपात आहेत, सर्वकाही नश्वर आहे म्हणून कशाच्या मोहात पडू नये.' तर लगेच तिचे उत्तर हजर, ' देवा, जर का चराचरात तू सामावले आहेस, जर का कणा-कणा मध्ये तुझे अस्तित्व आहे ; तर का त्या कणा-कणाचा मोह धरू नये? आणि फळाची अपेक्षा धरो वा ना धरो कर्म तर करायचेच आहे, पण फळ म्हणून जर तुझी इच्छा धरली तर ? ' आणि मग पुन्हा ती मला अनुत्तरीत करते. तिच्या ठायी राग आहे लोभ आहेत, स्वार्थ आहे; पण तरीही ती माझी आहे, माझा अंश आहे. तिच्या मनामध्ये मी भरून उरलो आहे. त्यामुळे तिच्या मनात येणाऱ्या प्रत्तेक मोहाचा, स्वार्थाचा मी साक्षीदार आहे. ती जेव्हा स्वताशी बोलते तेव्हा ती माझ्याशीच बोलत असते नकळतपणे. खरच ती वेडी आहे. जेव्हा मी तिच्या आणि तिने माझ्या गळ्यात माळ घातली तेव्हा मला वाटले खरच मी तृप्त झालो. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला तर तो माझ्या तृप्तीपेक्षाही कित्तेक पटींनी जास्ती होता. माझे समाधान तर राधेला प्राप्त केल्यासारखे होते, पण तिचा आनंद तर विश्वाच्या सर्वे सर्वा असलेल्या विश्व्कार्त्याच्या प्राप्तीचा आनंद नव्हता तर तिच्या प्रेमाचा, वेडेपणाचा विजय होता तो. ती कितीक सुंदर हळवी, रागीट. मग काय झाले, राग तर देवाधिदेव महादेवाला पण आहे. तिला भेटल्यावर वाटल कि गीता परत एकदा लिहावी, ज्यामध्ये खरच तिच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तिला देवू शकेल."
" माझ्या प्रिय वेडीला प्राणाहून प्रिय बनवले आहे - या प्राणहीन कृष्णाने."
too good pri....awesome article...vachun ekdum mast vatale :)
ReplyDelete-Amey
Hey Amey,
Deletethank you for your appreciation. :)