कुकरची शिट्टी झाली आणि तिची तंद्री तुटली. फटाफट लसून सोलायला तिने सुरुवात केली. तेवढ्यात समोर खिडकीतून तिला एक ट्रक उभा दिसला, २-४ माणस त्यामधून समान उतरवून तिच्याच बिल्डींगमध्ये घेवून येताना दिसली. तिला लक्षात आला कि साने काकूंच्या घरी कोणीतरी नवीन किरायदार आला आहे ते. साने काकुनी तशी कल्पना तिला फोनवर दिली होतीच, पण इतक्या पटकन तिथे त्यांना नवीन भाडेकरू मिळेल असं वाटल देखील नव्हत. पण असो, तिच्या किचनच्या खिडकीतून साने काकूंच्या किचन ची खिडकी आणि हॉल ची ग्यालरी दोन्ही नीट दिसत असल्याने तिला नवीन करमणूक मिळणार होती. मागचे भाडेकरू म्हणजे कोलेजच्या ३-४ मैत्रिणी होत्या. तिला त्या आधीच्या चार जणींचा पहिला दिवस आठवला.
नवीन होत्या शहरामध्ये आणि डॉक्टर चा कोर्स ला शिकत होत्या एवढंच तिला कळाल होत - तेही त्यांच्या गळ्यातल्या स्टेथोस्कोप मुळे. ती कधीच त्यांना बोलली नव्हती पण त्या जणू काही तिच्या जिवलग मैत्रिणीच होत्या. पहिल्या दिवशी त्या चारही जनी ग्यालारीमध्ये च दिवसभर गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांची खरी नाव तिला माहिती नव्हती पण टोपण नाव तिला २ वर्षांच्या कालावधीमध्ये पाठ झाली होती - मणी, कुकी, शिल्पी आणि रोशा. त्यांची खरी भाषासुद्धा तिला कधी काढता आली नाही कारण कधी त्या हिंदीमध्ये बोलत कधी मराठीमध्ये कधी इंग्रजी मध्ये तर कधी भोजपुरी-बिहारीमध्ये. त्यांच्या ग्यालारीमध्ये त्यांनी दिवाळीला दिवे, तर ख्रिसमस ला बेल्स तर ईद ला लाइटिंग केलेली असायची म्हणून त्यांचा धर्मही तिला कधी समजला नाही पण जेवा त्या ग्यालारीमध्ये मस्त गप्पा टाकत उभ्या असायच्या ना तेव्हा तिला आपल्या किचनमध्ये मनोमन आनंद व्हायचा. तिला त्याचं स्वच्छंदी जीवन त्या किचनमधून पाहायला खूपच आवडायचं. हाकेच्या अंतरावर त्या चौघींच किचन आणि ग्यालरी असल्यामुळे ती जणू त्यांच्या प्रत्येक ख्सानामध्ये सोबत होती.
"मम्मी मम्मी" करत विशाल आला आणि तिची तंद्री परत एकदा तुटली. विशाल ने हैप्पी मदर्स दे म्हणून तिच्या हातामध्ये एक फुल टिकवल. आणि एक गोड पापी गालात देवून निमूट उभा राहिला.
ती - काय झाल, असं का उभा आहेस? काही हवाय का तुला?
विशाल - मला रिटर्न गिफ्ट कुठे दिलास तू!
ती विशाल च्या गालावर तिचे ओठ टेकवत म्हणाली - घ्या साहेब तुमच रिटर्न गिफ्ट, खुश आता.
विशाल - अग मम्मी तुला माहितीये, साने काकूंकडे नवीन ताई दादा आलेत. ताई ने आम्हा सर्वाना चोकलेट पण दिले. मी पण तिला लगेच आपल रिटर्न गिफ्ट देवून आलो.
ती - हो, मगाशी मी मोठी गाडी पहिली खिडकीतून पण पाहिलं नाही कोण होत ते. बर तू तुझा होमवर्क केलास का?
विशाल - हो केला.
ती - कधी केलास ? शाळेतून आल्यापासून तर बाहेरच आहेस.
विशाल - म्हणजे नाही केला, तू मला पूर्ण वाक्यच बोलू देत नाहीस. मला भूक लागलीये आधी जेवायला दे आणि मग अभ्यास.
ती - ठीकेय. जेवण झाल्यावर आपण दोघेपण अभ्यासाला बसुयात.
एव्हाना तिचा स्वयंपाक पूर्ण बनवून झाला होता. जेवण करून आवरून ती किचन साफ करत होती, सहज बघावं विशाल चे नवीन कोण ताई-दादा आहेत असं विचार मनात आला म्हणून तिने किचनची खिडकी उघडली. तर त्यांच्या किचनची लाईट सुरूच होती. ती थोडावेळ पाहत राहिली कि कोणी दिसेल म्हणून पण दिसलं नाही. ती खिडकी लावणार एवढ्यात तिने आवाज ऐकला, मना म्याडम कॉफी तयार आहे. आणि तो दिसला. काळा शर्ट, केस विस्कटलेले तरीही मधून भांग आहे हे स्पष्टपणे दिसत होत, हातामध्ये २ कॉफीचे मग घेवून निघाला. तेवढ्यात तिचे लक्ष ग्यालारीकडे गेले. तिथे ती दिसली. गुलाबी पंजाबी ड्रेस मध्ये केस मोकळे, रात्र झाल्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता पण तिच्या आकृतीकडे पाहूनच तिचे मन प्रसन्न झाले. तेवढ्यात तो ग्यालरी मध्ये अवतरला.
तो - "घ्या म्याडम तुमचा चंद्र ढगांच्या पलीकडे जायच्या आधी तुमची कॉफी तयार आहे."
ती - "जया थांकू थांकू. आम्ही आपले आभारी आहोत. "
तिला त्या दोघांची ओळख झाली अगदी पहिल्या दिवशीच. त्यांच्या त्या घरातल्या पहिल्या दिवशी. तो जया आणि ती मना. तिला कळाल नवीन जोडप आलंय राहायला ते, आणि कदाचित हि त्यांची लाडाची नाव असतील. ती विचार करू लागली - कदाचित त्याच नाव जय असेल. किंवा जयेश, जयपाल, जयकुमार किंवा अजून असंच काहीतरी. आणि तीच मोनाली, मनिका, मंदाकिनी. नाही नाही मंदाकिनी नसेल. मंजुश्री, असू शकेल किवा अजून दुसरच काहीतरी असेल.
ती विचारच करत होती तेवढ्यात मना ओरडली - " ए आला आला, परत चंद्र बाहेर आला ढगांमधून "
जया - "मना माझी शर्त तर मी पूर्ण केली, तुझा चंद्र ढगामध्ये जायच्या आधी कॉफी बनवली आता तुलासुद्धा तुझी शर्त पूर्ण करावी लागेल. जा जावून कचरा टाकून ये."
मना विचित्र तोंड करत करत निघून गेली आणि तो ढगामधल्या चंद्राकडे पाहण्यात मग्न झाला. कॉफीच्या वाफा हवेमध्ये विरून गेल्या होत्या.
तिने खिडकी लावून घेतली, शेवटच फडक मारलं किचनमध्ये आणि झोपायला गेली. आज तिची रात्र खूप सुंदर होणार होती - तिच्या स्वप्नात चंद्र येणार होता. तिने लाईट बंद केला, अंधारामध्ये स्वताला एक मंद स्मित दिलं आणि पापण्या मिटल्या.
No comments:
Post a Comment