'दिल चाहता है' पिक्चर रिलीज झाला होता तेव्हा दोन गोष्टी त्यांच्या नसानसात भिनल्या होत्या. त्यातली एक म्हणजे गोव्याची ट्रीप आणि दुसरी म्हणजे आमीर खानच आणि त्याच्या मित्राचं जेव्हा भांडण होत तेव्हा अमीर खान ऐकत असलेल गाणं (Desert Rose by Sting ). त्यांचा ग्रुप कट्ट्यावर बसल्यावर हमखास ट्रीप चा विषय निघायचा आणि त्यामध्ये बीच वरच्या ट्रीप ला नेहमी प्राधान्य असायचं. आणि आपण आपल्या आई पप्पांना कस गंडवून ट्रीप ला जावू शकतो ह्याचे जास्ती प्लान ठरायचे. चार - पाच वर्ष झाली फक्त ठरवा ठरवीच सुरु होती आणि त्या प्लान ला मूर्त स्वरूप मिळायचे चान्स दिसू लागले. नशिबाने आई पप्पांना गंडवायची गरज भासली नाही कोणाला. पण कुठे ना कुठे फिरकी टाकावीच लागणार होती. आणि ती त्यांनी एकदम यशस्वीरीत्या टाकली होती. सर्व जण न पिताच एकदम सातव्या आस्मानावर कि काय म्हणतात ना तिथे होते. आणि खर तर त्यांना नशा येण्यासाठी असल्या खम्ब्यांची नाही तर मित्रांची गरज होती. एकदा ते सर्व जण एकत्र आले कि मग आधी हशा आणि मग त्या हर्षासुराची नशा. बाकी बाह्य गोष्टी म्हणजे क्षुल्लक होत्या. अजून एक त्यांचा नियम होता - "अभी नही तो कभी नही ." त्यामुळे मनात आल ते केल नही तर त्यांना अपचनाचा त्रास होतो. म्हणजे त्यापुढे जे काही होत ते त्यांना बिलकुल पचत नाही. तर अशा प्रकारे मजल दर मजल करत ५ वर्षांनंतर त्यांच्या त्या प्लान ला मूर्त स्वरूप आले होते.
* * *
त्यांचे पावलांचे तळवे त्या खाऱ्या पाण्यामध्ये भिजले आणि बऱ्याच वर्षांच्या तपस्येच फळ मिळाल्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये एक शांतात भरून आली. तो समुद्र सुद्धा त्यांच्या भेटीच्या स्पर्शाने एकदम शांत झाल्यासारखा मंद मंद लाटा किनाऱ्यावर सोडत होता. खूप आनंद किंवा संधान मिळाल्यावर त्यापुढे फक्त शांतता असते हेच भासत होत.
ती कुठल्यातरी लेखकाची शाळेत शिकलेली कविता त्यांच्यातल्या एका कार्टूनच्या डोक्यात नक्कीच घुमली असेल -
"माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे "..
त्या उनाड डोक्यांमध्ये आता हळू हळू वारे शिरत होते, एक भन्नाट वारे.
४ दिवस बिनधास्त जगायचे, वाऱ्यावर उडायचे, लाटांवर तरंगायचे, आयुष्याला स्पर्श करतील आणि कोणत्याही दुखामध्ये हसवतील-धीर देतील अशा आठवणी जमा करायचे...
* * *
त्यांचा घोळका त्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असणाऱ्या किल्ल्यावर मस्ती घालत होता. सूर्यास्ताचे भरपूर फोटो काढून झाले. सूर्य मावळला, आणि सगळीकडे एक जांभळी-गुलाबी-नारंगी झाक पसरली. निसर्ग हळू हळू अंधाराकडे चालू लागला होता. त्या उंच किल्ल्यावरून समुद्राचे पूर्ण दर्शन होत होते. दूर क्षितिजाच्या जवळ तपकिरी रंगाची उधळण करून तो भास्कर त्याच्या घरी निघून गेला होता. त्यांचा घोळका त्या किल्ल्यांच्या कड्यावर बसून हे डोळ्यात आणि मनामध्ये साठवण्याचा प्रयत्न करत होता.
अंधार नेहमी वाईट वाटायचा, पण अंधाराकडचे मार्गक्रमण इतके सुरेख असू शकेल असे वाटले नव्हते. कदाचित हि पूर्णत्वाचे रंग आपल्याला याच वेळी अनुभवता येतात. हे रंग दिवसभरात कोणत्याच प्रहरी दिसणार नाहीत, पण या सांजवेळीच त्यांचा खेळ रंगलेला असतो.
जसा तो सूर्योदय असंख्य आनंदाचे किरण घेवून येतो, उत्साहाचे वातावरण घेवून येतो; अगदी तसेच हा सूर्यास्तदेखील एक वेगळीच शांतात आणतो. पूर्णत्वाची शांतता. तो जांभळा रंग कदाचित सूर्योदय कधीच आणू शकणार नाही.
पण यातली एकही गोष्ट त्या उनाड टाळक्या मध्ये आली नाही. असं म्हणतात कि आपण आनंदात असेल तेव्हा आपल्याला असं काही feel होत नाही. feel होण्यासाठी थोड तरी दुख लागत.
आणि त्यांच्या डोक्यात तर फक्त वार भरलं होत - आनंदाच वारं.
incomplete story?
ReplyDelete@ Abhay - Thank you for visiting my world.
DeleteAbout Story - For now its complete, I might extend it, after completion of their(the group mentioned in the story) next plan. :)