ती आणि तिचे कुटुंब फिरायला गेले होते. तिचे अहो आणि तिची मुले आनंदात खेळत होती.
मुल आता मोठी झाली होती. एकीच लग्न झाल होत आणि मुलगा नोकरी करत होता.
मुलगा आणि वडील याचं बोलन सुरु होत.
त्यांच्या भागामध्ये एक दारूचे दुकान उघडले होते त्यावरून.
ती दुपारची विश्रांती घेत होती. वर्तमान पत्र वाचत होती. तिने डोळे झाकले, आणि पुनः तिचा स्वप्नातला प्रवास सुरु झाला.
तीच आयुष्य ती अशीच तर स्वप्नामध्ये जगात आलीये. प्रत्तेक वेळी आपल्या मनासारख घडत असेल स्वप्नामध्ये तर का नको न असा जगायला. आणि तीच मनही हलक होवून जाई . आणि मग तिला Theory of Quantum आठवू लागली. जशा पदार्थाच्या निरनिराळ्या अवस्था असतात, जसे कि पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थामध्ये असते. जशी Transition Phase असते तशीच आयुष्याच्या पण अवस्था असतात. एका अवस्थेमध्ये जर ती housewife असेल तर दुसऱ्या कोणत्यातरी अवस्थेमध्ये कदाचित ती तिच्या मनाजोगी एखादी Corporate Woman असू शकेल. म्हणूनच तिला या स्वप्नाच्या जगामध्ये जायला खूपच आवडे.
मुलगा येवून तिला उठवू लागला पण तिची तंद्री लागली होती स्वप्नाच्या जगात.
मुलगा जावून वडिलांना म्हणाला - "बाकी काही असो पप्पा. आपली आई मात्र खूपच लवकर नशेमध्ये जाते आणि दुसर्या दुनियेमध्ये रमते."
वडील "अरे पण तिला दारूची गरज नाहीये. ती अशीच स्वताच्या इच्छा शक्तीवर नशेत जाते. तिची दारू एकदम देसी आहे. दारू देसी."
* * *
No comments:
Post a Comment