Tuesday, August 30, 2011

मित्रा तू प्रेमात बुडलास, हे मात्र खर..

आता तुला नक्कीच पावसाच्या कविता आवडत असतील,
कारण नेहमीच तुला पावसात भिजणारी ती दिसत असेल..
मित्रा तू प्रेमात बुडलास, हे मात्र खर...
आता तुझ्या मनामध्ये स्वप्नाचे डोंगर बनतील,
त्या डोंगरावर तुझ आणि तिचं छोटस घरट असेल,
घरात्यासमोर एक बाग असेल,
बागेत एक गुलाबच झाड असेल,
तू रोज त्या झाडाच एक गुलाब तिला देशील,
आणि ह्या ओळी वाचताना मंद मंद स्वतःशीच हसशील,
मित्रा तू प्रेमात बुडलास, हे मात्र खर...
आता तुला स्पर्शाचे वेगळे अर्थ उमगतील,
आसवांशी नवी ओळख होईल,
आणि त्या आल्हाददायक प्रेमाशी तुझ नात जुडेल..
कवी-चित्रकार तुला भावतील..
प्रत्येक चौकटीमध्ये तू स्वताला बसवू पाहशील,
तिचा हिरो आहेस अशी दिवसा ढवळ्या स्वप्न पाहशील,
मित्रा तू प्रेमात बुडलास, हे मात्र खर ...
आता तू सारखाच तिचा विचार करशील,
तिच्या अवती भवती तुझे विचार भुंग्यासारखे गुणगुणतील,
ती मात्र कमळासारखी पाकळी मिटून घेईल,
तेव्हा तू माझ्या मित्रा तिच्या एका कटाक्षासाठी धडपडशील,
"तुझे नि माझे नाते काय" या ओळींशी जुंपशील..
तुझेच प्रश्न आणि तुझीच उत्तर असतील..
तेव्हा तू मित्रा  प्रेमात पार बुडला असशील...


No comments:

Post a Comment