"ती" वर खूप जण लिहितात. खूप काही लिहितात. खोल, उथळ, शांत, उज्वल, मंद, नाजूक, सुंदर, गोड,निरागस, भावूक, सोज्वळ, हवीशी, नकोशी, सहज, आणि ती अलगद...
ती माहिती नाही कोण आहे, कुठून आलीये, कुठे जाणारे, किवा तिचा पत्ता, काहीच माहिती नाहीये. पण तरीही ती हवीशी वाटते, तिला ओळखत नाही पण जन्म जन्मांतरीच्या तिच्या कहाण्या, सर्व कहाण्या माहिती असल्यासारख्या वाटतात. तिची सोबत जणू श्वासासारखी भासते, हो भासतेच. कारण ह्या "ती" चा हा भासच आहे जो वेडावून सोडतो.
"ती" वर कोणाचा कब्जा नाहीये, कोणाची सत्ता नाहीये, कोणाची मालकी नाहीये, "ती" मुक्त आहे - जन्मापासून, मृत्युपासून, जगण्यापासून. ती अशीच अलगद अलगद आहे.
हवेवर स्वार आहे. स्वप्न तिचे गाव आहे. आणि "ती" हेच तिचे नाव आहे ..
ती कशी नेहमीच अलगद अलगद, हवेवार स्वार असते,
झुळूके ची दोर तिच्या हाती दिलेली असते,
कदाचित म्हणूनच वेडे मन हे उगाच त्या वादळात उडी मारू पाहते..
तिच्या मनाच्या तळाशी जावू बघते..
ती अशीच अलगद अलगद, हवेवर स्वार असते..
बाकी कशाशी तिचे घेणे देणे नसते,
उगाच जगणे तिला मान्य नसते,
ती हसते तेव्हाही पाण्यावरती तरंग उमटते..
ती अशीच येते आणि झुळूक बनुनी जाते,
एका क्षणाची तिची मिठी त्या हवेत विरघळून जाते ...
ती त्याच हवेवर स्वार होवून अलगद निघून जाते ...
स्पर्श हवेचा आजही तिची कहाणी वदतो,
ती होती हा भासही मजला हुलकावणी देवून जातो,
ती कमळ आणि मग शब्द माझा भुंगा बनून जातो,
तिच्या भोवती गिरकी घेवून लांबूनच परतू येतो,
ती आपल्या पाकळ्या मिटून मूक निरोप घेते,
मजसोबत त्या हवेलाही ती वेड लावून जाते...
ती मात्र अलगद अलगद स्वप्नात विरून जाते ....

No comments:
Post a Comment