Monday, August 8, 2011

Happy Friendship Days !!!

Decide  कर लिया  था मैने, इस बार किसी को call  नही करूंगी.. बघुयात किती मित्र गोळा केलेत आणि किती लोकांचे personally  email  येतात ते. कोणी फोन तर करणार नव्हतच, लांब राहते न सर्वांपासून, फोनला बिल जास्ती येत. पण साधे email  सुद्धा आले नाहीत. बस्स, फार फार तर कोणी कोणी facebook  वर tag  तेवढ केल होत. पण facebook  चे tag  म्हणजे तिसऱ्याच्याच स्वप्नामध्ये येवून चौथ्याने टपली मारण्यासारखे वाटते.
बाकी काही नाही. दोस्त दोस्त म्हणवणाऱ्यानीही साधी आठवण सुद्धा काढली असेल कि नाही शंकाच आहे, आणि मग दोस्तीच्या आणा भाका घेताना लावलेले नियम मात्र मलाच लागू केले होते जणू. आम्ही मात्र फोन करावा, email  करावा, facebook  वर जावून दहाबारा hi  hello  टाकावेत. कधी कधी आमच्या प्रिय वाटणाऱ्या दोस्तांवर चार शब्दही लहावेत. कविता कराव्यात त्यांच्या दोस्तीची मिसाल देणाऱ्या आणि सर्व काही करावे. आणि आमच्या दोस्त मंडळीनी ?? त्यांना काय वेळ नसतो. काहीना girl friend (s  ???) असतात. काहींचा दिवस फारच दिवस busy  असतो. बर आम्ही काहीच जमल नाही तर फकस्त एक miss काल द्यावा अशी विनंती सुद्धा करून पाहिलीये. पण कोणाला काही फरकच पडत नाही. हा, आणि मग आम्ही फोन केला नाही कि, सर्व बोलायला मोकळे , "लंडन गेल्यापासून फार बदलली आहे.", " आता काय बाबा, तुम्ही फॉरेनची मंडळी ", "अग जाम वैताग आलाय, weekend  ला मी फक्त आराम करतो. मस्त लोळतो." , "आरे यार, तू तरी कुठे फोन  केलास इतक्या दिवसात", "आम्हाला वाटले विसरली आम्हाला ", "अग माझ प्रोजेक्ट आहे", "माझी परीक्षा आहे ", " माझा आज over  time  होता "....... २५ हजार  किलो कारण असतात सर्वांकडे. थकत नाहीत कारण देता देता.

[break  : निरमा निरमा वॉशिंग पावडर निरमा... दुध सी सफेदी निरमा से लायी, रंगीन कपडा भी खिल खिल जाये..सबकी पसंद निरमा.]

माझ तर म्हणन आहे, कि खरच मनापासून एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्याला स्पर्श केला असेल, तर त्या व्यक्तीची आठवण काढल्याशिवाय राहवत नाही. आणि इच्छा तिथे मार्ग. पण इच्छाच नसेल तर मार्ग तरी कुठून येणार ? अरे माझ्या मित्र मैत्रीणीनो, घरामध्ये लोळत पडल्या पडल्याही तुम्ही तुमच्या मित्रांना वेळ देवू शकता. इच्छा पाहिजे फक्त.
मला मधूनच हिंदीची लहर येते. आणि जरा वेगळ्या भाषेमध्ये प्रण केल्यास त्याला जरा वजन येते, असा माझ्या मनाचा (गैर ) समज आहे. म्हणून यावेळी हिंदीमाढेच ठरवून टाकलं - "इस बार किसी को call  नाही करूंगी".
पण माझाच पोपट झाला आणि मग मी उडून गेले. (कृपया विनोद न कळल्यास डोक्याला त्रास करून घेवू नये.) कोणी म्हणजे कोणी म्हणजे कोणीच माझी साधी आठवणही काढली नाही. किवा माझ्यापर्यंत आलं नाही कि आठवण काढली आहे म्हणून.
फार फार राग आला ... पण करणार काय ?
मीसुद्धा एक साधं "Happy  Friendship  Day " असं status  facebook टाकलं होत, बस्स त्याला कोणी कोणी like केल होत. इतकच.
मगर मै इसका बदला लेके रहूंगी.



[अगले सप्ताह - देखते है कैसे बदला लेती ही ये दोस्त अपने करीबी दोस्तोंसे... इसीही जगह पर, इसीही ब्लॉग पर मिलते है अगले सप्ताह .. तब तक के लिये. शुक्रिया, अलविदा, शब्बा खैर, शुभ दिन/ रात्री, सायोनारा. C ya .. ]

1 comment:

  1. बस का यार प्रिया ? हीच का आपली शोले वाली दोस्ती ? आपली मैत्री काय फक्त फ्रेंडशिप डे पुरतीच सिमित आहे का ?
    म्हणजे जर तुला तेव्हा विश केल तरच आम्ही तुझे मित्र ? हे काय लोजिक आहे ?
    तस असेल तर सांग , ह्या पुढे तुला नाचुकता विश करत जाऊ आम्ही.

    ReplyDelete