कधी कधी सहज सुंदर
नयन मनोहर
उगाच हुरहूर
अखंड बडबड
मनात काहूर
क्षणात भण भण
हसू मण मण
पाण्यात तरंग
आकाशाचे रंग
उशीत डोके
डोळ्यात झोप
झोपेत स्वप्न
स्वप्नात जग
येणे झपझप
जाणे झर झर
हाताशी हात
स्पर्शात बात
उरात धडधड
डोक्यात पडझड
उगीच लोळणे
मधूनच हसणे
शून्यात जाणे
गर्दीत शांत
एकट्यात वाद
पंख्यात वारा
पावसात गारा
उषेचा सूर्य
चंद्राचा पसारा
उजळू पाहे
आसमंत सारा
अजून काही
मनात बाही
ओठात नाही
नजरेत पाही
ओळखून घेई
घडी हाती
नाही म्हणता
रुसनेच बहुदा
गुस्सा नाही
रागाचा तोरा
अजून पुढे
क्षितिजाच्या इथे
धरती जिथे
मिळे आकाशाशी
हितगुज चाले
कधी न कळले
नाहीच उमगले
जवळच गवसले
पाण्याचा झरा
फुलांचा सडा
रांगोळी वेलीची
सळसळ पानांची
असाच एकांत
पकडण्या चिमटीत
प्रयत्नले.
अजून पुढे,
पडली गाठ
तरी न आठव
आसवांची
जिकडे प्रकाश
तोच माझा प्रांत
कहाणी गडबडलेली
जन्माची भ्रांत ...
Hi kavita aikavanar kashi???? Lai sapadat nahiye... i mean ti rhythm basat nahiye.. if only u cud record wht u have written..
ReplyDelete