"हे बर आहे, आमच्या जोरावर तुम्ही पुस्तक पण छापायला लागलात, हं ??" स्टेज वर चढता चढताच गर्दीतून मागून कोणीतरी आदित्य ला हटकल होत. तो मागे वळून त्या गोंगाटातून येणाऱ्या ओळखीच्या आवाजाच्या दिशेने पाहतो तर जान्हवी होती मागे. तेवढ्यात गर्दीतून धक्काबुक्की करत प्रेस वाले लोक आले, आदित्य स्टेजवर गेला. त्याच्या पहिल्या कवितेच्या पुस्तकाला पुरस्कार भेटला होता. पुरस्कार घेवून, आणि आभाराचे दोन शब्द बोलून तो लागलीच खाली आला. स्टेजच्या मागे जान्हवी त्याची वाट पाहत होती. तो येताच तिने तिच्या पर्स मधून एक गुलाबाचे फुल आणि एक ग्रीटिंग कार्ड काढले. "अभिनंदन आदी."
"काय हे जानु, तू पण ना. पण तू तर अजिबात येणार नव्हतीस ना. मग कशी आलीस? मी इतका वाईट आहे कि तू इतकी चिडलीस आणि इथे माझ्यासाठी येण्यास नकार पण दिलास. मग अशी कशी उगवलीस?"
"तू गप्प बैस आता. मी येणार नाही असं कस होईल. बर हे घे तुझ्यासाठी आणलंय."
आदित्य फुल घेतो. "thanks ".
पुरस्कार सोहळा संपताच दोघे सोबतच निघतात.
"खर तर आज सेलिब्रेशन पाहिजे. चल आपण पाणीपुरी खावूयात. "
"ओ बाईसाहेब, तुमच्या दहाव्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तरी पार्टी दिली नव्हती तुम्ही आणि आता माझ्या पहिल्याच पुस्तकाला पुरस्कार मिळाला आर लग्गेच त्या पुस्तकच क्रेडीट पण तुम्हालाच आणि वरून पार्टी पण तुम्हालाच. हे चांगल आहे."
"खरच .. मला खर वाटत नाहीये. त्यादिवशी आपण पावसात भेटलो नसतो आणि तुला त्या दिवशी एखादा जोब भेटला असता तर आपण असे भेटत राहिलो नसतो. ना मी माझी पुस्तक लिहायची हौस पुढे नेली नसती ना आज माझे इतके सारे पुस्तक प्रकाशित झाले असते." जान्हवी एकदम भूतकाळात मग्न होते...
तेवढ्यात आदित्य तिची तंद्री तोडत म्हणतो,"आणि ना आज माझ्या कवितेच्या नायिकेला घेवून मी इथे पाणीपुरी खाल्ली नसती."
"खरच जानु , तुला पाहिलं ना कि मला कविता सुचू लागते. हे अगदी पहिल्यापासूनच आहे पण मला खूप उशिरा कळलं कि माझ्या कवितेचा उगम तुझ्यामध्ये आहे ते. खरच माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर. "
"खूप म्हणजे किती?"
"खूप म्हणजे ... म्हणजे २५ किलो. २५००००० किलो.. "
दोघेही हसू लागतात.
"ए आपण आभाला खूप दिवसात भेटलो नाही बघ. या सुट्टीच्या दिवशी आपण पक्का भेटूयात हं."
"अगं आत्ताच नाही जमायचं, आता माझी परीक्षा पण आहे दोन आठवड्यावर. असं करूयात माझी परीक्षा झाली कि आपण सर्वांनाच भेटूयात. छान प्लान करू. अगस्तीपण येतोय दीड वर्षानंतर ओस्ट्रेलिया तून. आपण संजूला फोने करून बोलवून घेवू. श्रेयू तर आहेच इथे. ती येईल. आभाशी तू बोलून घे ."
"ओके ."
.......
"हेलो, काकू आभा आहे का? "
"अग ती बाहेर गेलीये. तू ?"
"काकू मी जान्हवी बोलतेय. आभाला सांगा या रविवारी सर्वांनी भेटायचा प्लान केलाय ते. आणि तिला फोन पण करायला सांगा."
"ठीक आहे. सांगेन तिला. ठेवते."
"हेलो .."
"बोला जान्हवी madam , मग फिक्स झाला का वेन्यु? कुठे जमायचं ?"
"अग हो हो... तू तर लगेच सुरु होतेस. श्रेयू मला सांग तुला रविवारी तर सुट्टी असतेच, पण यावेळी सोमवारी-मंगळवारी पण सुट्टी घे. ३ दिवस आपण धम्माल करणार आहोत. संजू बाबा आलाय कालच."
"काय्य्य .. संज्या आला? आणि मला सल्याने एकपण फोन नाही केला. चंपक. थांब मी त्याला फोन लावते."
"अग अग, चिडू नकोस. त्याच्या आई पप्पा सोबत तो मुलगी पाहायला जाणार होता आज. म्हणून त्याने तुला फोन केला नसेल ग. आणि त्याच आणि माझ पण बोलन नाही झालाय. ते तर मी त्याच्या फेसबुक वर स्टेटस पाहिलं. म्हणून सगतीये. आणि मुलगी पाहायचं मला आदित्य बोलला. कदाचित आदीच आणि त्याच बोलन झालाय. चिल. तो भेटणारे ना तेव्हा त्याची खेच हवी तेवढी."
"हो तुला बर इतका पुळका आलाय त्या संजूचा. पण वेट वेट ... संजय कर्वा आणि मुलगी पाहायला ?? अरेरे अडकला बिचारा. हा हा हा हा."
"तू हसू नकोस. हे मारवाडी लोकांमध्ये मुलगा-मुलगी भेद नाही करत. दोघांची लग्न लवकर करून टाकतात. हे हे. पण खरच संजू अडकला बिचारा. "
"ए जानु, बर तुझ आणि आभाच बोलन झाल का? ती येतीये ना ? "
"हो. म्हणजे आधी तिच्या मम्मी सोबत झाल होत बोलन पण नंतर तिने फोन केला होता. तीपण येतीये."
"आभा तर एकदम हिरोईन झाली आता. तीच काय बाबा.."
"श्रेयू , बस झाल बर का आता. किती खेचनारेस सर्वांची. बर चल मी ठेवते फोन नाहीतर तू काही थांबणार नाहीस. "
गुरुवारी सकाळी अगस्ती ओस्ट्रेलिया तून निघतो ते शुक्रवारी पोचतो. शनिवारी संध्याकाळी सर्व जन दिवे आगार ला जायला निघतात. सुमो मध्ये नुसता सर्वांचा धिंगाणा चाललेला असतो. आदी आणि अगस्ती दोघ सुरात सूर मिळवून संजूच्या मुलगी पहायच्या प्रोग्राम ची बातमी विस्तृत पाने सर्वांसमोर मांडत असतात. आणि बाकी सर्व त्याला चिडवण्यात कमी सोडत नसतात. ३ दिवस भरपूर मज्जा करून सर्व जन परत येतात.
अगस्तीच पी.एच.डी. च सबमिशन झालेलं असत. त्यामुळे त्याला आता रिझल्ट ची वाट पाहण्यात दिवस घालवायचे असतात. बाकी आभा आपल्या शुटींग मध्ये बिझी होवून जाते. जान्हवी पण तिच्या जॉब, प्रोजेक्ट आणि पुस्तक लेखनामध्ये. संजू दिल्ली ला निघून जातो. श्रेयू मात्र बर्यापैकी रिकामी असते. ऑफिस सुटल कि ती, अगस्ती, आणि आदित्य भटकत असतात.
आदित्यचा पण रिझल्ट लागतो, तो यावेळी सी.ए. च्या सर्व परीक्षा पास होतो. आणि त्याला मोठ्या कंपनीतून ऑफर येते. तो तिथे जॉईन होतो तसा श्रेयू आणि अगस्तीच भटकायला उरतात.
No comments:
Post a Comment