बाकी सर्व ठीक आहे ,
पण तू अजूनही लांब आहेस - बास्स इतकच..
सूर्यही रोज उगवतो आणि मावळतो त्याच्या वेळेनुसार,
रात्री रात किडे सुद्धा किरकिरतात त्यांच्या स्वभावानुसार,
पण स्वप्न मात्र अजूनही अपूर्ण आहे,
बास्स, बाकी सर्व ठीक आहे..
स्वप्नांना सुद्धा आता एकटे पडण्याची सवय झाली आहे - बास्स इतकच ..
उन्हाचे कवडसे तुझ्या सावली प्रमाणेच निघून गेलेत घरातून,
चहाचे रंगही फिकेच आहेत तुझ्या हातच्या पत्ती वाचून ,
रोज चिवचिवणारी चिमणी सुद्धा गेली कायमची उडून,
बाकी सर्व ठीक आहे ,
पण आता ते चिमणी चे घरटे रिकामे आहे - बास्स इतकच ...
हातामध्ये तुझा मऊ मऊ हात यायचा,
जणू जगाचा विसर पडायचा,
खांद्यावरती जेवा डोक ठेवून तू पेंगायाचीस बस मध्ये,
तेव्हा मात्र झोपायाचीस तू आणि मीच जायचो स्वप्नामध्ये,
आता ती बस सुद्धा गावात यायची बंद झाली ..
बाकी सर्व ठीकच आहे ,
फक्त आता हातामध्ये आधारासाठी मऊ मऊ काठी आहे - बास्स इतकच ....
No comments:
Post a Comment