Friday, July 15, 2011

अडगुल मडगुल ... पाऊस !

जून महिना सुरु व्हायचा आणि पावसाची चाहूल लागायची. नवीन वर्ग, नवीन दप्तर, नवीन वह्या पुस्तक. कधीतरी नवीन गणवेश सुद्धा. मृग नक्षत्र भरून वाहायचा आणि पावूस राजा ४ महिने च्या कंत्राटावर कामाला यायचा.
शाळेमध्ये मैदानात चिखल चिखल वाहायचा. तसा मला पावसाला कधीच आवडायचा नाही, तो आवडायला लागला ते college मधेच आणि तेही जेवा डोंगरा-डोंगरातून आमच्या साफाऱ्या चालू झाल्या तेवाच. शाळेमध्ये असताना असा वाटायचं कि पावूस डांबरी रस्त्यावर पाडवा, मातीवर पडून चिखल करू नये. पावसाळ्यातल्या रविवारची दुपार अशीच माझी बाल्कनीमध्ये उभी राहून पावसाकडे निखार्ण्यात जायची. तेव्हा पावसाच नात इतकाच असायचं कि जाम भिजायला आवडायचं. मग पुन्हा कधी तरी मोठे झाल्यावर पावसामध्ये प्रेमाचा ओलावाही असतो हे कळायला लागल. "पावूस असा रुणझुणता, पैजाने सखीची स्मरली" किवा "आता पुन्हा पावूस येणार, पुन्हा तुझी आठवण येणार" वगैरे गाणीही भारी वाटायला लागली ती मोठे झाल्यावरच. पण लहानपणी एकाच आणि एकाच गाणं माहिती होत आणि तेच खूप आवडायचं, ते म्हणजे - "ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा .." या गाण्यातली सर मला नेहमी शाळेत शिकवणारे सर का असा संभ्रम असायचा. तशी गाण्यांची मोड तोड करण्यात मी फार भारी होते.
असाच पावसाला ये ये म्हणत रोज छत्री विसरून जायचे आणि घरी जावून आई चे धपाटे खायचे. सर्व दप्तर, पती पुस्तक सर्व भिजून जायचं. मग त्याला तव्यावर गरम करा, पंख्या खाली ठेवा, हे करा ते करा चालू व्हायचं. अगदीच लहानपणी गडगडात चालू व्हायला लागला आणि आम्ही प्रार्थनेसाठी मैदानावर असलो कि म्हणायचो - "म्हातारी दळण दळते आहे ". वीज चमकली कि म्हण्याचो देवाने battery चामकावली वाटत.
अजून एक कल्पना होती माझ्या मनात कि छोटे असताना आपण जर का मेलो तर देव भेटतो आणि त्याच्या घरी घेवून जातो.
पावसाची गम्मतच भारी होती पण तेव्हा, खूप पावूस पडायला लागला कि शाळेला बुट्टी मारायची - आई कधीतरी गरम गरम भजी करायची. संपूर्ण दुपार मस्त पांघरुणात घालवायची आणि दुपारभर Tom & Jerry  ची पारायण करायची.
जरा मोठे झालो तेवा पाऊस चालू व्हायची लक्षणं दिसली कि आमचा क्लास आहे, किवा बाहेरून काहीतरी आणायचं आहे हे आठवायचं. अशा वेळी उशीर होण आणि मग पावसात भिजण ठरलेल असायचं.
खरच पाऊस तोच राहिला - रिमझिम, जोरदार, भुरभूर. बदललो ते आपण. वयानुरूप आभाळ भरून यायचे अर्थही बदलले. आधी आभाळ भरून आल कि मस्त झोप यायची आणि नंतर जे प्रेमी आहेत आणि दूर आहेत, त्यांचा जीव कासावीस व्हायचा, जे प्रेमी जवळ आहेत ते पावसातल्या त्या दुर्मिळ क्षणांची मजा लुटायचे. जे मित्र आहेत त्यांच्या गप्पांचे कट्टे रंगायचे - आता पाऊस येणार खूप भिजणार म्हणून मग कुठे चहा मारायचा, कुठे पकोडे खायचे याचे plan चालू व्हायचे.
मला मात्र माझी एका  अडगुल-मडगुल type कवितेच्या काही ओळी आठवतात. फारच बालिश आहे, कारण  शाळेत असतानाच केलेली आहे. तेव्हा फक्त शब्दांची जुळवणी म्हणजे कविता असा वाटायचं.
आला रे आला पाऊस  आला
पाऊस आला रे पाऊस आला
टपोऱ्या टपोऱ्या गारा लेवून ,
सोसाटी वारा अन धारा घेवून..
बाकी पावसावर तशी भरपूर गाणी हिंदी-मराठी-इंग्रजी मध्ये आहेत.
पण सर्वात भावतं ते मराठी गाणंच. आणि तेसुद्धा सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच.

आता पुन्हा पाऊस येणार,
पुन्हा तुझी आठवण येणार...

1 comment:

  1. आला रे आला पाऊस आला
    पाऊस आला रे पाऊस आला
    टपोऱ्या टपोऱ्या गारा लेवून ,
    सोसाटी वारा अन धारा घेवून..

    हे खूप जास्त भारी वाटलं मला...

    आता पुन्हा पाऊस येणार...मग तुझी आठवण येणार... असंच काहीतरी....

    ReplyDelete