Thursday, July 14, 2011

सावळा गोंधळ

आमचे सर म्हणायचे कि सावळा गोंधळ करू नका रे.. सावळा गोंधळ म्हणजे नक्की काय किवा गोंधळ हा सावळा - गोरा - काळा असतो हे माहितीच नव्हतं.. माहिती होत ते फक्त गोंधळ करणे, मज्जा करणे, खूप गप्पा मारणे.. इति ... बरयाच वेळा बेंच वाजवणे, मोठमोठ्याने गाणी म्हणणे असेही यामध्ये येत असे. पण कुलकर्णी सर इतक्या मऊ पणे "सावळा गोंधळ करू नका रे " असा म्हणायचे कि आम्हाला अजूनच चेव चढायचा .
असा गोंधळ मी अजून कुठे पहिला असेल तो म्हणजे संसदेमध्ये. विरोधीपक्ष नेते काय चेव येवून मोठमोठ्याने बोलतात कि हे पाहून मला आमचा शाळेतला सावळा गोंधळ आठवायचा नेहमीच. मी पप्पांना म्हणायचे देखील हे लोक आमच्यासारखे करत आहेत. पण तो सावळा गोंधळ करताना किती आनंद व्हायचा हे आज कळतंय .. आपण खर तर लहानपणीच खूप मोठे असतो आणि मग जसे जसे आपण मोठे होतो खर तर आपण मोठे नाहीत होत, तर लहान होत जातो. लहानपणी शेजारच्या काकूंच्या स्वयंपाक घरामध्ये जावून थेट त्याच्या डब्ब्या कडे बोट दाखवून त्यातले लाडू पाहिजेत असे सांगायचो. तेव्हा किती सहजता आणि किती मोकळीक असायची वागण्यामध्ये. मी असा नाही म्हणत कि आजही आपण थेट स्वयंपाक घरामध्ये जावून डब्ब्या मधून लाडू घ्यावेत काढून पण त्यावेळी बजावलेल्या हक्कासारख आपण काकुना direct  लाडू मागून खावू शकत नाही का ? कि त्यांनी विचारण्याची वाट पहायची असते.
कोणाशी भांडण झाल कि त्यात सर्वात महत्वाच कट्टी आणि बट्टी इतकाच असायचं. पण आता त्या भांडणातले धागे दोरे निष्णात पोलीसाप्रमाणे लक्षात ठेवून आपण पुढच्या भांडणात जुळवायचे प्रयत्न करतो.
खरच तुकारामांच्या त्या ओळींचा अर्थ आता मला समजत आहे - "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ". म्हणजे खर तर लहानपणीच आपण सुज्ञ असतो, मोठेपणी आपण मोह - राग - मत्सर यामध्ये इतके गुरफटत जातो आणि जगाच्या रिती रिवाजाचे इतके अवडंबर माजवतो कि पावसामध्ये भिजल्यावर सर्दीच नाही तर आनंदही होतो हेच विसरून जातो आपण. चांदण्याचे मोजता येत नसल्यातरी त्या मोजताना आपण एकत्र व्हायचो हेच विसरून जात आहे. आणि खर तर काय मिलता मोठ होवून - हेवे दावे च न ! खूप कमी लोक गोष्टी आहेत तशा स्वीकारत असतात आणि बाकीचे ९० % लोक ते बदलण्याच्या प्रयत्नामध्ये अडकून पडलेले असतात . दुसर्या गोष्टी बदलण्यापेक्षा स्वतामध्ये बदल करण्याची गरज असते हे कोणालाच लक्षात येत नाही. कोणालाच स्वतामध्ये बदल केलेले आवडत नाहीत पण दुसऱ्यांनी थे बदलाव, तिथे बदलाव, हे बदलाव, ते बदलाव असा मात्र नेहमी वाटत असत.
लहानपणीचे गोळे खाणे, पावसात भिजणे आणि आईचे धपाटे खाणे, वाहत्या पाण्यामध्ये कागदी बोट करून सोडणे, विमानाचा आवाज आला कि आकाशामध्ये पाहणे हे मोठेपणी सर्वाना बावळट पणा वाटतो.
स्वताशीच विचार केला कि वाटत कि आपण आपल्याभोवती अदृश्य अशी किती तरी बंधन लादतो कि त्यामुळे आपल जगतो तर खर पण मारतेवेळी काय जगलो हा मोठा प्रश्न पडतो.
आयुष्यामध्ये निरंतर सावळा गोंधळ असायला हवा. आपण दृश्य बंधामध्ये अडकून राहण्यासाठी नाही जन्म घेतला आहे, तर मुक्त पणे श्वास घेवून जगण्यासाठी आणि आनंदात राहण्यासाठी आहे. अडचणी आणि संकट हीतर नेहमीच असतात पण तरीही ज्या गोष्टीमुळे आनंद मिळतो त्या गोष्टी करायलाच हव्यात . कारण आयुष्य खूप छोट आहे, आणि जीवन खूप मोठ आहे.
स्वताला कमी लेखू नका, स्वताची मनाची  काळजी घ्या, हसा आणि हसत रहा. तुम्ही जगत आहात म्हणजेच तुम्ही लायक आहात . स्वताची तुलना करू नका, स्वत बदला पण  दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका - तुम्ही स्वतामध्ये बदल करावा असा कोणी बोलाल त तुम्हाला कस वाटेल ?
आयुष्य खूप सुंदर आहे, चांदण्या पहा , चंद्र पहा , सूर्योदय पहा, फुले पहा , निसर्ग जगा...
लहान बाळाच हसण पहा - खरच हसण इतका का अवघड आहे ?




काल माझ्या स्वप्नात मी बर्फ बनले होते ,
पण वीतळायाच्या  आधीच मी झोपेतून उठले होते..
लहानपणीच्या गोष्टीतली म्हातारी मला भेटली,
मला भीती दाखवू लागली,
पण त्याच गोष्टीतली परी येवून तिला फटके देवून गेली ..
चालत चालत दूर वर जाताना आजोबांची तुकाराम गाडी आठवली,
प्रत्येक थांब्यावर आजोबा म्हणत कि - अगं पुढच्या स्टेशनावर येणारे ती गाडी ..
ती गाडी कधी यायची नाही, पण चालत चालत घर यायचं..
कदाचित हीच तुकाराम गाडी असेल ..
आईची मैत्रीण घरी आली कि खावू घेवून यायची,
म्हणुनतर तिच्या सामानाची पिशवी आम्ही दारातूनच पळवायची ..
तिला मात्र कौतुक भारी - मुल मोठी झाली..
काल स्वप्नामध्ये मी माणूस बनले होते,
खूप हसत  आणि हसवत होते ..
पण चिंता नको,
खरच माणूस बनायच्या आधी मी झोपेतून उठले होते ...
                             
                          - प्रिया


खरच आपण माणूस नाहीच आता - आता आपण एक मशीन बनलो आहोत. जी पावसात भिजल्यावर short  circuit  होते .. जिला खूप काम केल्यावर बंद पडते... जी खूप आनंदी राहू शकत नाही, जी कंपनीतून बाहेर पडू शकत नाहीत.
खरच माणूस बनुयात का ? सावळा गोंधळ करू यात का ?
आयुष्य पुन्हा जागुयात का ? लोळून लोळून  पोट धरून हसुयात का?


-Written by  प्रिया

2 comments:

  1. लई जास्त भारी...
    २५ हजार किलो पेक्षा जास्त भारी...
    कविता लिहू पर्यंत मस्तच होतं..पण आता हे लेख पण...
    Simple Awesome Pri....
    अशक्य भारी.... :) :) :)

    ReplyDelete
  2. @ प्रितेश : धन्यवाद !

    काही शब्द अजून बाकी आहेत,
    काही स्वल्पविराम अजूनही वाट पहात आहेत,
    एक स्वप्न उराशी आहे,
    चार शब्द ओठाशी आहेत,
    अजूनही ते चौथे प्रहर बाकी आहे..

    सर्व काही खरे होईल,
    बस्स पहाटेचे किरण बाकी आहेत...

    ReplyDelete