सायकल वरून उतरून ती सायकल हातामध्ये पकडून गेटमधून आत आली. उडणारी ओढणी हळूच तिने सावरली. सायकल ला लॉक करून ती तिच्या कॉलेजच्या बिल्डींग च्या दिशेने चालू लागली. तो भला मोठा कॉलेजचा पसारा पाहून तीच मन खूप खुश झाल. त्या बिल्डींग ची मोठी लाईन ती एक क्षण थांबून पाहू लागली. तिने तिचे डोळे झाकले.
कोलेजला जायच्या आदल्या दिवशी जी खूप सारी शोप्पिंग केली होती त्यातून एक फाडू टोप आणि स्कर्ट तिने काढला. हातामध्ये मेटल, प्लास्टिक, फायबर च्या मिक्स केलेल्या रावडी बांगड्या, एकाच हातामध्ये. आणि दुसर्या हातामध्ये एक मोठ्ठ फ्रेन्डशिप band . तिच्या त्या बाईक वरून ऐटीत उतरून तिच्या कोलेजच्या बिल्डींग कडे ती जावू लागली. पहिल्याच दिवशी तिचा फक्कड ग्रुप जमला. खूप सारे गेम्स खेळले, प्रोग्राम ला डान्स केले. इवेन्ट्स लीड केले. चार वर्ष फुल धमाल करून भरपूर अभ्यासही तिने केला. कोलेजच्या शेवटच्या वर्षी तिला मस्तपैकी जॉबसुद्धा मिळाला. आणि तीच मन खूप खुश झाल. आणि तिने पटकन डोळे उघडले. ओढणी सावरत ती कोलेजच्या पायऱ्या चढू लागली.
कोलेज संपल, रिझल्ट लागला ; कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षी खूप तयारी करूनही तिला जॉब मिळाला नाही तसा तिचा कोलेज संपल्यावर जॉबसाठी शोध सुरु झाला. त्या दिवशी ती पहिल्या interview ला त्या काचेच्या आवरनातल्या बिल्डींगमध्ये गेली होती. काचेच्या लिफ्ट मधून सातव्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये जाताना तिला खालचे लोक, साफसफाई करणाऱ्या बायका दिसू लागल्या. तिला खूप गम्मत वाटली. आता रोज आपल्याला या काचेच्या लिफ्ट मधून यायला भेटणार म्हणून ती खूप खुश झाली. interview झाला. ती ऑफिसच्या लॉबी मध्ये येवून रिझल्टची वाट पाहत बसली. तिथे बसल्या बसल्या तिला ऑफिसमध्ये येत-जात असलेले एम्प्लोयी दिसले. त्यांच्या गळ्यामध्ये ऑफिसचा आय डी कार्ड अडकवलेला होता. त्या ओफिसाच दार ती सर्व लोकं त्या गळ्यातल्या कार्ड नेच उघडत होती. आता तिला तिच्या रिझल्टच टेन्शनच येत होत. तेवढ्यात ओफिस्माढले सर आले आणि तिथे आलेल्या सर्वांचे रिझल्ट त्याने सांगितले. ती जड पावलाने तिथून निघाली.
चार सहा महिने ती अशीच सगळीकडे interview साठी फिरत होती. त्या दिवशीसुद्धा ती अशीच एका छोट्याशा कंपनीमध्ये interview साठी गेली होती. टेस्ट झाली आणि त्या कंपनीच्या लॉबी मध्ये ती रिझल्ट ची वाट पाहत बसली होती. टेन्शन ने तीच मन खूप जड झाल्या सारख वाटत होत. तिथे समोरच कृष्णाची मूर्ती होती, त्या मूर्तीकडे पाहून डोळे झाकले.
ती त्या ब्लेझर मध्ये खूपच मस्त वाटत होती. भराभर पायऱ्या चढून तिने दुसरा मजला गाठला. जेवढी ती बाहेरून मस्त वाटत होती तेवढाच तिला आतूनपण खूप मस्त मस्त वाटत होत. ऑफिसमध्ये जायच्या आधी ती वॉशरूम मध्ये गेली, तिच्या पर्स मधून तिने परफ्युम काढाल आणि मस्त पैकी मारलं. थोडस पावडर लावून ती बाहेर आली. गळ्यातल्या आय डी कार्ड ने तिने ऑफिस च दार उघडल. ती आत गेली आणि सर्वाना गुड मोर्निंग म्हणत आपल्या क्युबिकल मध्ये जावून बसली. फायलींचा पसारा आणि भरपूर काम यात तिला वेळेच भानही राहील नाही. आज तिला जॉब मिळून एक महिना झाला होता आणि तिचा पगार होणार होता. ऑफिस वरून येताना ती जवळच्याच मॉल मध्ये गेली. पप्पांना वॉच, मम्मी ला साडी, बहिणीला ड्रेस, शेजारच्यांना वाटायला स्वीट्स, मित्र-मैत्रीणीना एक एक डेरी मिल्क अशी पहिल्या पगारातली शोप्पिंग करून घरी आली. घरी आईने पहिला पेढा देवापुढे ठेवून नमस्कार करायला सांगितला. तिने देवासमोर दिवा लावला, पेढा ठेवला आणि हा संपन्न दिवस दाखवला म्हणून देवाला आभार मानण्यासाठी डोळे झाकले.
प्रार्थना करून तिने डोळे उघडले. तिला आता जरा हलक हलक वाटू लागल. घड्याळात तिने पाहिलं तर दीड तास वगैरे होवून गेला होता. अजून कोणीच रिझल्ट बद्दल काही सांगत नव्हत. पण टेन्शन ने जड झालेलं तीच मन आता बरच हलक झाल होत.
तिला आज पाहायला येणार होते. ती तयार होत होती, तिची एक मैत्रीण तिला मेक-अप करून देत होती. आय लायनर लावून घ्यायला तिने डोळे झाकले.
बाहेर मुलगा, त्याचे आई वडील, भावू ,काका, काकू, आत्या सर्व जन आले होते. चहा पाणी झाल्यावर तिला बाहेर बोलावले. थोडे फार प्रश्न झाले, मुलाच्या आई ने तिला जवळ बसवून घेतले. अगदी अनौपचारिक पणे तिच्याशी बोलताना एकदम मुलाच्या आई म्हणाली, " ए तुला पिक्चर पाहायला आवडत का?" ती एकदम शॉक झाली. पण त्यानंतर तिची आणि त्या मुलाच्या आईची गट्टी जमली. तिने हळूच मुलाकडे पाहिले तर तोही तिच्याकडे पाहत होता. तिने गोड हसून प्रतिसाद दिला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी "killing smile " अस तिला सांगून गेले. तीच मन सुखावलं.
जाता जाता त्या मुलाच्या आई ने तिचा फोन नंबर घेतला आणि म्हणाली, "लग्न जमल नाही तरी आपण दोघी पिक्चर पाहायला सोबत जावू बर का." आणि सर्व घर हास्य कल्लोळाने भरून गेल. तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणाली, "डोळे उघड आता, झाल लावून आय लायनर." तिने डोळे उघडले. ती तयार झाली. तेवढ्यात तिच्या बहिणीने येवून सांगितलं कि पाहुणे आले.
जाता जाता त्या मुलाच्या आई ने तिचा फोन नंबर घेतला आणि म्हणाली, "लग्न जमल नाही तरी आपण दोघी पिक्चर पाहायला सोबत जावू बर का." आणि सर्व घर हास्य कल्लोळाने भरून गेल. तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणाली, "डोळे उघड आता, झाल लावून आय लायनर." तिने डोळे उघडले. ती तयार झाली. तेवढ्यात तिच्या बहिणीने येवून सांगितलं कि पाहुणे आले.
तिला अनुरूप वर पाहून मम्मी-पप्पानी लग्न ठरवलं. तिचा लग्नाचा दिवस उजाडला. सगळीकडे गडबड होती, त्या गडबडीत ती बुजून गेली होती. तिच्या मैत्रिणींची तिला आठवण येत होती. हातावरची मेहंदी तिने एकटीनेच एन्जोय केली होती. तिच्या मैत्रीणीना जॉब मुळे येता आलं नव्हत, कोणाला सुट्टी मिळाली नव्हती. नाही म्हणायला दोघीजणी अक्षतेच्या वेळी आल्या होत्या. लग्न लागल. जेवताना नवरदेवाने भरवला तेवढाच घास तिच्या पोटात गेला होता. विदाई च्या वेळी ती जेव्हा आई ला भेटायला आली तेव्हा आई आत्त्याला आहेर करत होती. ती तशीच उभी राहिली तिथे. पण ती पारदर्शक असल्याप्रमाणे त्या रूम मधले सर्व वावरत होते. तिच्या बहिणी पण लांब बसून होत्या. तीला अजूनच दाटून आल. तिने तसाच सर्वांचा निरोप घेतला. गाडीतून तिच्या आयुष्याच्या साथीदाराबरोबर जाताना ती खूप रडत होती. आणि कशासाठी हेच तिला कळत नव्हत. नवीन घरात प्रवेश केल्यावर लक्ष्मी पूजन वगैरे आटोपून ती तिच्यासाठी असलेल्या खोलीमध्ये गेली तिच्या करवलीसोबत. गादीवर पडल्यावर तिने डोळे झाकले. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी तिचा नवरा आणि ती दोघे फिरायला गेले. तेव्हाच मम्मी पप्पांचा फोन आला, त्यांना त्यांच्या लाडकीची आठवण येत होती. त्यांनी तिला २ मि. येवून भेटून जाण्याची विनंती केली पण तिच्या नवऱ्याने ते मान्य केले नाही. तिने उदासवाणे तिचे डोळे मिटून घेतले.
लग्नाचा दिवस उजाडला. तिच्या मैत्रिणी, तिची लाडली बहिण, आत्या मामा सर्व जन जमले होते. हळदीचा डाग तिच्या आवडत्या रूमलाला लागला म्हणून तिला वाईट वाटत होत. तिच्या नवऱ्याने तिच्याकडे आणि रुमालाकडे पाहून हळूच स्वताचा पांढरा शुभ्र रुमाल तिच्या हाती टिकवला.तिच्या मैत्रिणी जॉब मधून अगदी चार दिवस सुट्टी काढून आल्या होत्या, ती सगळ्यांसाठी खूप खास अशी होती ना. मेहंदीच्या दिवशी तिच्या मैत्रिणी तिला इतक्या चिडवत होत्या. ती लाजून चूर होत होती. सर्व जणींनी डान्स केला, तिनेही नंतर डान्स केला. तिची आई अगदी कौतुकाने लेकीकडे बघत होती. मेक अप साठी पार्लर मध्ये गेली होती तेव्हा तिच्या नवरोबाचा सारखा फोन येत होता. आणि तिच्या मैत्रीणीना अजून चेव चढत होता.
नटून थटून नवरी पाटावर चढली. अंतरपाट पडला, तिने गोड हसून नवरोबाला हार घातला आणि आणि त्याने तिला. तिच्या जीवनाची गोड सुरुवात झाली होती. जेवताना तिच्या नवऱ्याने कौतुकाने पूर्ण ताट संपेपर्यंत खावू घातलं आणि तिनेही त्याला खावू घातलं. सर्व विधी आटोपले, निरोपाची वेळ जवळ आली. तिच्या आई ने तीच सुवासिनिच रूप डोळे भरून पाहून घेतलं. आनंदान पण अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्वांनी तिचा निरोप घेतला. नवरोबासोबत सासरी जाताना ती जेव्हा रडत होती, तेव्हा तीच हात तो अखंडपणे आपल्या हातात घेवून थोपटत होता. जणू काही त्याला म्हण्याचाय कि सखे हे तुझे अखेरचे अश्रू असतील, इथून पुढे तुझ्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त हसू असेल, सदाफुलीच हसू.तिने तिच्या नवीन घरात वाजत गाजतच प्रवेश केला. लक्ष्मी पूजन होवून ती तिच्या करवलीसोबत खोलीत आराम करण्यासाठी गेली. तेवढ्यात तिचा नवरोबा तिची कृष्णाची मूर्ती घेवून हजर झाला. तिला त्या मूर्तीकडे पाहून खूप बर वाटल. ती त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली आणि डोळे उघडले तेव्हा ती गाडीत होती नवऱ्यासोबत. ती आणि तिचा नवरा फिरून घरी गेले.
क्रमशः
क्रमशः