"जिंदगी सितार हो गयी, रिमझिम मल्हार हो० गयी "
त्याने फेसबुक वर केलेलं स्टेटस अपडेट तीन पाहिलं आणि तीच मन खूप खुश झाल. स्टेटस अपडेट हि खूप मामुली गोष्ट होती खर तर.. पण त्या वाक्यातल्या भावना आणि खोली फक्त तिलाच ठावूक होत्या. अस काही त्याने केल कि तिला प्रथम त्याचे लुकलुकणारे डोळे आठवत, त्या डोळ्यातलं तिच्यासाठीच खोल आणि निस्सीम प्रेम आठवत. तिला मग त्यांची पहिली भेट आठवत. तसे ते आधी खूप वेळा भेटलेले, चांगले मित्र ! पण ती भेट खास होती. त्याने न बोलताच मनातल प्रेम व्यक्त केल होत आणि तिलाही ते उमगल होत. सुरुवातीला ना ना करता तिच्या मानाने तिची सर्व गणित चुकवली होती आणि ती प्रेमाच्या एका समीकरणात अडकली होती.
***
तिचा वाढदिवस होता आणि तिला तो दिवस त्याच्यासोबत त्याच्यासोबत घालवायचा होता. पण परीक्षेमुळे त्याला ते जमणार नव्हता. म्हणून मग तिने त्याच्या कॉलेजच्या परिसरात भटकायला जायचं ठरवलं म्हणजे येताना त्याच्यासोबत बसमधून घरी येत येईल आणि त्या बहाण्याने तिला त्याच्या सोबत वेळाही घालवता येईल. पण बसमध्ये त्याने तिला विषच केल नाही. ती हिरमुसली. तशीच गुस्सा होवून घरी निघून गेली. तो मात्र फुल घेवून तिच्या घरी गेला. ती खुलली. त्याने आणलेलं फुल तिला खूप आवडलं.
***
ते दोघे आणि त्यांची मित्रमंडळी सी सी डी मध्ये गप्पा टाकायला जमले होते. तो मात्र गप्पा कमी आणि तिचे फोटो काढण्यात मग्न होता, कोणाला लक्षात आले नाही. तिला मात्र समजले, तीसुद्धा मस्त मस्त पोझ देवू लागली - गुपचूप गुपचूप.
***
त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला ती चार महिने झाल पैसे साठवत होती. शेवटी मनाजोगे पैसे जमल्यावर तिने त्याच्यासाठी शोधून शोधून एक शर्ट घेतला. गुलाबी रंगाचा. त्यावेळी तो प्रेमाचा रंग हे लक्षात आले नाही. तिने फक्त बेस्ट शर्ट शोधून आणला त्याच्यासाठी. त्याला तो शर्ट देताना त्याला त्या शर्ट मध्ये कधी पाहीन असे तिला झाले होते.
पुढे तो शर्ट त्याने कधी घातला कि नाही याची तिला काहीच कल्पना नव्हती.
***
इंग्लिश स्पिकिंग चा कोर्स तिने लावला होता. तिथल्या एका तासाला सर, extra curricular activity म्हणून Platonic Love याबद्दल इंग्लिश मध्ये बोलत होते. ती खूप मन लावून ऐकत होती.
"Platonic love is the love beyond physical attraction, beyond age-cast, beyond humanity, beyond distance, beyond bodies, beyond ourselves. Its beyond the real world. Its there, n so we are..."
***
त्याच्या खांद्याला टेबलाचा खिला लागला होता. हे जेव्हा त्याने सांगितले तिला तेव्हा पुढच्या भेटीत नेमकं कुठे आणि किती आणि कस लागलाय हे तिने बघायचे ठरवलं होत. पण तो समोर आला कि तिला सर्व विसरायला व्हायचं. ती पूर्णपणे blank व्हायची. आणि मग तिला काही आठवत नसे.
गाडीवर त्याच्या मागे बसून तिची अखंड बडबड चाले. रोडवरच्या पिवळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून तिला गाडी चालवलेली खूप आवडायची म्हणून ती नेहमी त्याला त्या पट्ट्यांवरून गाडी चालवायला सांगायची.
असाच गाडीवर बसून भटकत असताना तिला एकदम त्याच्या खांद्याबद्दल आठवले. ती हळू हळू दोन्ही खांद्यावर फुंकर मारू लागली, कारण तिला नेमकं कोणता खांदा हेच माहिती नव्हते. तेवढ्यात एका खड्यात बसलेल्या हादऱ्यामुळे तिने पटकन त्याच्या खांद्यावर हात ठेवला, नेमकं ज्याला लागला होत तोच खांदा.
त्यावेळी तो लगेच बोलला - तुला लाक्षत्पण नाही कि माझ्या खांद्याला खिळा लागला आहे आणि ती साध विचारलं पण नाहीस !
***
ते दोघे सी सी डी मध्ये बसले होते. स्ट्रोबेरी मिल्कशेक मागवला होता. त्याच्यावरच तू फेस पाहून ती खूप खुश झाली होती आणि मग्न होवून आस्वाद घेत होती. तो मात्र तिच्याकडे एकटक पाहण्यात मग्न होता. तिला तो पाहतोय हे एकदम जाणवलं पण तिने दाखवून नाही दिल. त्याने तिच्याकडे असा पाहत राहिलेलं तिला फार फार आवडायचं.
***
तिला माहिती नव्हता कि त्याला अस अचानक काय झालाय. भांडण तर आधीपण व्हायची, पण हल्ली तो तुटक तुटक वागत होता. जणू काही त्यांची एकमेकांसोबतची साथ आता संपत आली होती. हळू हळू संवाद सुद्धा बंद झाला.
पण प्रेम नक्कीच नाही. ते कधी संपणारही नव्हते. फक्त पडद्याआड जाणार होते.
त्याने तिच्यावर जीवापाड म्हणतात ते काय तसे प्रेम केले होते म्हणून त्याच्या आठवणी येवून तिला कधी रडूही आलं नाही. ते प्रेमाचे चार क्षण तिला मिळाले याचाच तिला आनंद व्हायचा. त्यासाठी ती त्याला मनातून नेहमी धन्यवाद देई, कारण त्या Platonic Love चा अर्थ तिला उमगला होता. जणू काही त्या स्टेटस अपडेटच्या ओळी खर्या झाल्या होत्या -
"जिंदगी सितार हो गयी, रिमझिम मल्हार हो० गयी "