तो कुलूप उघडून आत आला आणि दप्तर सोफ्यावर फेकून दिलं, मोजे एकीकडे फेकून हिरमुसलेल तोंड घेवून खुर्चीवर मांडी घालून बसला. एकदम पायाचा वास आला आणि डोक्यामध्ये आवाज खणखणला 'आधी पाय धुवून ये'. तसाच उठला पाय धुतले, आणि परत येवून खुर्चीत बसला. टी व्ही चा रिमोट समोर होता पण त्याचा मूड आज टोम अन्ड जेरी पण चांगला करू शकणार नव्हता. तेवढ्यात ती आली, आली म्हणजे प्रकट झाली समोर त्याच्या.
आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकल. टी व्ही मध्ये त्याने सोनपरी पहिली होती अगदी तशीच होती हि सुद्धा. सुंदर सोनेरी केसांची. गोड गोड हसणारी. तो तिच्याकडे पहातच राही. ती खुदकन हसून त्याच्यासाठी गाणी म्हणत असे, ती रिंगा रिंगा रोझेस खेळत असत, गप्पा मारत, मग तो तिच्यसोबतच बसून जेवण करत असे, आणि तिच्या कुशीमध्ये झोपत असे. रात्री केव्हातरी त्याचे बाबा येत तेव्हा पर्यंत हा गाढ झोपेमध्ये असत. त्याच्या बाबाला खूप खूप काळजी वाटे त्याच्या चिमुकल्याची. त्याची परी मात्र त्याला सकाळी उठल्यावर दिसत नसे. तो परत नाराज होत असे ते संध्याकाळी घरी येवून परत त्याच्या परीला भेटेपर्यंत. त्याच पूर्ण आयुष्य म्हणजे त्या परीभोवती फिरू लागल. ती रोज संध्याकाळी येत असे, जेव्हा कोणी घरात नसे तेव्हाच. मोनू चे दिवस असेच त्याच्या परीसोबत मजेत जात होते. सकाळी त्याची आया येवून स्वयंपाक करून मोनू ला शाळेत सोडून जाई आणि संध्याकाळी त्याही परी येवून त्याला जेवण भरवी.
एक दिवस त्याचा बाबा लवकर घरी आला, त्या दिवशी त्याची परी राणी आलीच नाही घरी. मोनुला कळाल कि घरी कोणी नसेल तेव्हाच परीराणी घरी येते. दुसऱ्या दिवशी परीराणी आली तेव्हा त्याने विचारलं - "तू इथेच राहत जा ना, कुठेच जात जावू नकोस." परी काहीच बोलली नाही , फक्त मंद हसली.
मोनू चे बाबा हल्ली फार काळजीत असत. त्यांना आपल्या ७ वर्षांच्या मोनुची खूप काळजी वाटे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा दिवस जसा जवळ येवू लागला तसं त्यांची काळजी अजून वाढतच गेली. पण मोनू कशालाच घाबरायचा नाही तोपर्यंत जोपर्यंत त्याची परीराणी सोबत असे.
मोनू हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तसं परीरानीची यायची वेळ बदलली, आता ती रोज रात्री येवू लागली. वार्डातले सर्व जण झोपल्यावर ती मोनू ला भेटायला येवू लागली. मोनू आणि ती रात्री गप्पा मारत बसू लागली. त्या रात्री डॉक्टर फेरीला उशिरा आले आणि मोनुच्या रुमच्या बाहेरच थबकले. रूम मधून त्यांना मोनुचा आवाज येत होता - जस काही तो कोणाशी तरी बोलत आहे. डॉक्टरांनी वाकून पहिले आत कोणीच नव्हते आणि मोनू हवेत हात वारे करून एकटाच बोलत होता. प्रश्नांची उत्तर देत होता. पण प्रश्न विचारणार कोणीच नव्हत रूम मध्ये. त्याच्या समोर एक थाळी होती - रिकामी. आणि त्यामधून तो काहीतरी घास बनवून खात होता. पण थाळीमध्ये तर काहीच नव्हते. डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मोनुला तसाच सोडून पुढे गेले. दुसऱ्या दिवशी मोनुचे वडील आल्यावर त्यांना या गोष्टीची डॉक्टरांनी कल्पना दिली.
मोन्च्या सर्व तपासण्या अरात एकदा सुरु झाल्या. जवळ जवळ ३ महिने मोनू हॉस्पिटलमध्ये होता आणि हळू हळू तो त्याच्या बाबाला, नंतर आजी ला, नंतर आयाला सर्वाना विसरून गेला आणि त्याच्या कुटुंबात आता फक्त परीराणी होती. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हत आणि मोनुचा स्क्रीझ्रोफेनिया बळावत जावून शेवटच्या स्टेज ला पोचला.
तो काही खात नसे, निरंतर कल्पनेच्या विश्वामध्ये बडबडत असे.
त्या रात्री मोनुची आई नेहमीप्रमाणे मोनुला शाळेतून घेवून परत येत होती. रस्ता ओलांडताना मोनुचा आणि तिचा हात सुटला. मागे येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या धडकेने मोनुच्या आई ला धडक बसली. मोनू ने वळून मागे पाहिलं तेव्हा त्याची आई रक्तांच्या थारोळ्यात पडली होती. तो आई असा ओरडून तिच्या जवळ पळत गेला आणि त्याच्या आई ने तिथेच प्राण सोडला. मोनू खूप रडला. सारखा त्याच्या बाबांना आई कुठे आहे असा विचारात होता. त्याचे बाबा बोलले - "तुझी आई परी झाली आता. ती आता अभ्लात राहायला गेली." त्याची आई खूप सुंदर होती. सोनेरी केसांची, गोड गोड हसणारी. तो तिच्याकडे पहातच राहत असे. त्याल असा पाहताना बघून ती खुदकन हसून त्याच्यासाठी गाणी म्हणायची, ती आणि मोनू रिंगा रिंगा रोझेस खेळत असत, गप्पा मारत, मग तो तिच्यसोबतच बसून जेवण करत असे, आणि रोज रात्री मोनू तिच्या कुशीमध्ये झोपत असे.
No comments:
Post a Comment