Saturday, May 5, 2012

जिंदगी सितार हो गयी



"जिंदगी सितार हो गयी, रिमझिम मल्हार हो० गयी "
त्याने फेसबुक वर केलेलं स्टेटस अपडेट तीन पाहिलं आणि तीच मन खूप खुश झाल. स्टेटस अपडेट हि खूप मामुली गोष्ट होती खर तर..  पण त्या वाक्यातल्या भावना आणि खोली फक्त तिलाच ठावूक होत्या. अस काही त्याने केल कि तिला प्रथम त्याचे लुकलुकणारे डोळे आठवत, त्या डोळ्यातलं तिच्यासाठीच खोल आणि निस्सीम प्रेम आठवत. तिला मग त्यांची पहिली भेट आठवत. तसे ते आधी खूप वेळा भेटलेले, चांगले मित्र ! पण ती भेट खास होती. त्याने न बोलताच मनातल प्रेम व्यक्त केल होत आणि तिलाही ते उमगल होत. सुरुवातीला ना ना करता तिच्या मानाने तिची सर्व गणित चुकवली होती आणि ती प्रेमाच्या एका समीकरणात अडकली होती.
***
तिचा वाढदिवस होता आणि तिला तो दिवस त्याच्यासोबत त्याच्यासोबत घालवायचा होता. पण परीक्षेमुळे त्याला ते जमणार नव्हता. म्हणून मग तिने त्याच्या कॉलेजच्या परिसरात भटकायला जायचं ठरवलं म्हणजे येताना त्याच्यासोबत बसमधून घरी येत येईल आणि त्या बहाण्याने तिला त्याच्या सोबत वेळाही घालवता येईल. पण बसमध्ये त्याने तिला विषच केल नाही. ती हिरमुसली. तशीच गुस्सा होवून घरी निघून गेली. तो मात्र फुल घेवून तिच्या घरी गेला. ती खुलली. त्याने आणलेलं फुल तिला खूप आवडलं.
***
ते दोघे आणि त्यांची मित्रमंडळी सी सी डी मध्ये गप्पा टाकायला जमले होते. तो मात्र गप्पा कमी आणि तिचे फोटो काढण्यात मग्न होता, कोणाला लक्षात आले नाही. तिला मात्र समजले, तीसुद्धा मस्त मस्त पोझ देवू लागली - गुपचूप गुपचूप.
***
त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला ती चार महिने झाल पैसे साठवत होती. शेवटी मनाजोगे पैसे जमल्यावर तिने त्याच्यासाठी शोधून शोधून एक शर्ट घेतला. गुलाबी रंगाचा. त्यावेळी तो प्रेमाचा रंग हे लक्षात आले नाही. तिने फक्त बेस्ट शर्ट शोधून आणला त्याच्यासाठी. त्याला तो शर्ट देताना त्याला त्या शर्ट मध्ये कधी पाहीन असे तिला झाले होते.
पुढे तो शर्ट त्याने कधी घातला कि नाही याची तिला काहीच कल्पना नव्हती.
***
इंग्लिश स्पिकिंग चा कोर्स तिने लावला होता. तिथल्या एका तासाला सर, extra curricular activity म्हणून Platonic Love याबद्दल इंग्लिश मध्ये बोलत होते. ती खूप मन लावून ऐकत होती.
"Platonic love is the love beyond physical attraction, beyond age-cast, beyond humanity, beyond distance, beyond bodies, beyond ourselves. Its beyond the real world. Its there, n so we are..."
***
त्याच्या खांद्याला टेबलाचा खिला लागला होता. हे जेव्हा त्याने सांगितले तिला तेव्हा पुढच्या भेटीत नेमकं कुठे आणि किती आणि कस लागलाय हे तिने बघायचे ठरवलं होत. पण तो समोर आला कि तिला सर्व विसरायला व्हायचं. ती पूर्णपणे blank व्हायची. आणि मग तिला काही आठवत नसे.
गाडीवर त्याच्या मागे बसून तिची अखंड बडबड चाले. रोडवरच्या पिवळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून तिला गाडी चालवलेली खूप आवडायची म्हणून ती नेहमी त्याला त्या पट्ट्यांवरून गाडी चालवायला सांगायची.
असाच गाडीवर बसून भटकत असताना तिला एकदम त्याच्या खांद्याबद्दल आठवले. ती हळू हळू दोन्ही खांद्यावर फुंकर मारू लागली, कारण तिला नेमकं कोणता खांदा हेच माहिती नव्हते. तेवढ्यात एका खड्यात बसलेल्या हादऱ्यामुळे तिने पटकन त्याच्या खांद्यावर हात ठेवला, नेमकं ज्याला लागला होत तोच खांदा.
त्यावेळी तो लगेच बोलला - तुला लाक्षत्पण नाही कि माझ्या खांद्याला खिळा लागला आहे आणि ती साध विचारलं पण नाहीस !
***
ते दोघे सी सी डी मध्ये बसले होते. स्ट्रोबेरी मिल्कशेक मागवला होता. त्याच्यावरच तू फेस पाहून ती खूप खुश झाली होती आणि मग्न होवून आस्वाद घेत होती. तो मात्र तिच्याकडे एकटक पाहण्यात मग्न होता. तिला तो पाहतोय हे एकदम जाणवलं पण तिने दाखवून नाही दिल. त्याने तिच्याकडे असा पाहत राहिलेलं तिला फार फार आवडायचं.
***
तिला माहिती नव्हता कि त्याला अस अचानक काय झालाय. भांडण तर आधीपण व्हायची, पण हल्ली तो तुटक तुटक वागत होता. जणू काही त्यांची एकमेकांसोबतची साथ आता संपत आली होती. हळू हळू संवाद सुद्धा बंद झाला.
पण प्रेम नक्कीच नाही. ते कधी संपणारही नव्हते. फक्त पडद्याआड जाणार होते.
त्याने तिच्यावर जीवापाड म्हणतात ते काय तसे प्रेम केले होते म्हणून त्याच्या आठवणी येवून तिला कधी रडूही आलं नाही. ते प्रेमाचे चार क्षण तिला मिळाले याचाच तिला आनंद व्हायचा. त्यासाठी ती त्याला मनातून नेहमी धन्यवाद देई, कारण त्या Platonic Love चा अर्थ तिला उमगला होता. जणू काही त्या स्टेटस अपडेटच्या ओळी खर्या झाल्या होत्या -
"जिंदगी सितार हो गयी, रिमझिम मल्हार हो० गयी "


Tuesday, May 1, 2012

बाकी सर्व ठीक आहे


बाकी सर्व ठीक आहे ,
पण तू अजूनही लांब आहेस - बास्स इतकच..
सूर्यही रोज उगवतो आणि मावळतो त्याच्या वेळेनुसार,
रात्री रात किडे सुद्धा किरकिरतात त्यांच्या स्वभावानुसार,
पण स्वप्न मात्र अजूनही अपूर्ण आहे,
बास्स, बाकी सर्व ठीक आहे..
स्वप्नांना सुद्धा आता एकटे पडण्याची सवय झाली आहे - बास्स इतकच ..
उन्हाचे कवडसे तुझ्या सावली प्रमाणेच निघून गेलेत घरातून,
चहाचे रंगही फिकेच आहेत तुझ्या हातच्या पत्ती वाचून ,
रोज चिवचिवणारी चिमणी सुद्धा गेली कायमची  उडून,
बाकी सर्व ठीक आहे ,
पण आता ते चिमणी चे  घरटे रिकामे आहे - बास्स इतकच ...
हातामध्ये तुझा मऊ मऊ हात यायचा,
जणू जगाचा विसर पडायचा,
खांद्यावरती जेवा डोक ठेवून तू पेंगायाचीस बस मध्ये,
तेव्हा मात्र झोपायाचीस तू आणि मीच जायचो स्वप्नामध्ये,
आता ती बस सुद्धा गावात यायची बंद झाली ..
बाकी सर्व ठीकच आहे ,
फक्त आता हातामध्ये आधारासाठी मऊ मऊ काठी आहे - बास्स इतकच ....



Wednesday, March 21, 2012

चांदणं - ५


आदित्य लायब्ररी मध्ये काही पुस्तक शोधात होता. अगस्ती प्रश्नपत्रिकेच्या ढिगाऱ्यात बुजून गेला होता. अगस्तीच तेवढा त्यांच्यामध्ये एकदम किडू होता. खूप रट्टा मारायचा, आणि मार्क्स पण मिळवायचा. बाकी सर्व जण म्हणजे मधल्या फळीतले. धड स्कॉलर पण नाही आणि ढ पण नाहीत. श्रेयू मात्र हुशार होती ती बाकीच्या कलागुणांमध्ये. ती कॉलेजच्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असायची. आणि आभा ! आभा तर आपली फक्त आदित्य आदित्य करत रहायची. शेवटच्या वर्षाला असताना आदित्य ने C. A . करायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्याने अभ्यासाची तयारी चालू केली. तसा तो अभ्यासक्रम खूपच अवघड होता. पण आदित्य ने ठरवलं होत कि कसही करून हि परीक्षा पास व्हायची. दोन-चार वर्ष इथे नोकरी करून परदेशामध्ये जायचं. शेवटच्या वर्षी पूर्ण ग्रुपनेच आप आपली दिशा ठरवली होती. श्रेयू एम.कॉम. करणार होती. अगस्ती तर पी.एच.डी ची तयारी करायला लागला होता. संजय सायकोलॉजी मध्ये उच्च शिक्षण घेणार होता. पण आभा ची अशी काही दिशा ठरेना. आणि तशी तिला काही काळजी पण नव्हती. तिचे वडील एकदम श्रीमंत होते, त्यामुळे तिला ज्या कोर्स ला अडमिशन घ्यायचं असेल तिथे त्यांनी  तिला घेवून दिल असता.
पण त्या दिवशी सर्व जण लायब्ररी मध्ये होते. आभा आणि श्रेया त्यांच्या एका सरांकडे पुस्तक घेण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा तिथे सरांचे एक मित्र आले होते - प्रोफेसर चंद्रचूड.  ते नाटक- शोर्ट फिल्म-डोक्युमेंट्री यामध्ये काम करत असत. तर त्यांना एका सह-नायिकेचा शोध होता. त्यासाठी ते आपल्या मित्राच्या कॉलेजमध्ये काही नवीन talent सापडत का ते पाहायला आले होते. आणि तेवढ्यात श्रेयू आणि आभा तिथे पोचल्या. प्रोफेसर चंद्रचूड ला आभा बघताच क्षणी  भावली. त्यांनी तिला लगेच विचारलं कि तू माझ्या एका नाटक्मध्ये सह-नायिकेच काम करशील का? ती एकदम शॉकच झाली आधी. पण नंतर तिच्या सरांनी शांतपणे बसून चर्चा करण्याविषयी सुचवलं.
आभा आणि श्रेया, दोघीनिसुद्धा बरेच प्रश्न विचारले. कथनक काय आहे, काम कशा प्रकारच आहे, ते आउट डोअर आहे कि तिथेच होणारे,आणि मग त्याच्या वेळा वगैरे वगैरे. प्रोफेसर ने पण तिच्या अक्टिंग च्या अनुभवाविषयी विचारलं. जेव्हा त्यांना कळाल कि तिने पुरुषोत्तम मध्ये लीड रोल केला होता आणि त्यांना ४ थ्या क्रमांकच बक्षीस मिळालं तेव्हा ते खूपच खुश झाले. त्यांनी लगेच सांगितलं कि यावेळी पुरुषोत्तम मध्ये स्त्री वाडी खूप नाटके होती आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या कोलेज ने जे नाटक सदर केल त्याची नायिकाच माझ्या नाटकाची नायिका आहे. सर्व गप्पा झाल्यावर प्रोफेसर ने तिला स्वताच कार्ड दिल आणि विचार करून काय ते संग असाही सांगितलं.

अभाच्या घरी तसा तिला विरोध बिलकुल झाला नसता आणि तिची दिशासुद्धा ठरली नव्हती. पण तिला ह्या नाटक-सिनेमा क्षेत्रामध्ये जवस वाटत नव्हता. पण शेवटी ग्रुप मध्ये चर्चा करून सध्या जोपर्यंत काही ठरत नाही तोपर्यंत हे नाटक time pass म्हणून कराव असा ठरलं. त्याप्रमाणे तिने प्रोफेसर ना फोन करून तिची मंजुरी कळवली. आणि परीक्षा झाल्या झाल्या ती काम चालू करायला तयार आहे असाही सांगितलं.
प्रोफेसर ने तिला पुढल्या भेटीमध्ये बाकीची माहिती देण्याविषयी सांगितलं. 
यथावकाश सर्वांच्या परीक्षा संपल्या. सर्व जण आपआपल्या मार्गी लागले. अभाच सुद्धा नाटक सुरु झाल. हळू हळू सर्व जण पांगले. आधी आठवड्याला भेटायचे मग एक महिन्याला.. नंतर तर कोणाच्या वेळसुद्धा जमत नसत. पण आभा आणि आदित्य एकमेकांच्या संपर्कात होते. भेट नाही व्हायची पण फोन मार्फत नेहमीच ते संपर्कात होते. ती नेहमी त्याला तीच नाटक पाहायला बोलवायची पण त्याचा  C . A . चा अभ्यासक्रम त्याला बाहेर पडू देत नव्हता. 
दरम्यान आभाने सुद्धा आपल कॅरिअर नाटक-सिनेमा क्षेत्रामध्ये करायचं ठरवून टाकलं होत आणि ती तीच काम एन्जोय करत होती.
C . A . ची पहिली परीक्षा झाली आणि काबुल केल्याप्रमाणे आदित्यने आभाच नाटक पाहायला जायचं ठरवलं. खूप दिवस झाले सर्व जण भेटले नव्हते, म्हणून आदित्य ने सर्वांनाच जमवल यावेळी. फुल धम्माल करायची ठरली.  

नाटक सुरु झाल. आभाच्या एन्ट्री नेच नाटकाची सुरुवात होती. खरच आभा खूपच कसलेल्या कलाकारासारखी काम करत होती. सर्वांनाच चांगल वाटत होत. इंटर्व्हल नंतर मुख्य नायिका प्रवेश करणार होती. पोपकोर्न, कोक घेवून सर्व जण परत उर्वरित भाग पाहायला बसले. मुख्य नायिकेची एन्ट्री झाली आणि आदित्य एकदम आवाक झाला. मुख्य नायिका जान्हवी होती.


Sunday, March 4, 2012

रेशीम


काठगोदाम स्टेशनला तिची ट्रेन थांबलीती उतरायच्या तयारीतच होतीदोन मोठमोठ्या सुटकेसएक पर्स आणि हातामध्ये कागदाच्या सुरुळ्या सावरत ती फलाटावर उतरलीगुलाबी आणि आकाशी रंगाचा पंजाबी सूट आणि  त्यावर काळ्या रंगाच लेदरच  जकेट घातलं होतती समान सावरत स्टेशनच्या बाहेर गेलीतिने बुक केलेल्या कार ला यायला अजून बराच वेळ होतातिथून अल्मोरा ला पोचायला कमीत कमी तास दीड तास तरी लागत होतासकाळची वेळ होतीहिरव्या हिरव्या डोंगर रांगा धुक्यातून डोकावत होत्याअल्मोराच्या सौदर्याचा एक ट्रेलर तिला इथेच बघायला मिळत होतातिने टुरीस्ट कंपनीला फोन  लावायचा प्रयत्न केला पण फोन काही उचलला नाहीती तिथेच एका बाकावर टेकली आणि डोळे मिटले.
एक आठवणींचा स्लाईड शो तिच्या डोळ्यासमोरून झर्र्र कन निघून गेलातिच्या आयुष्यातला तो खूप महत्वाचाकलाटणी देणारा आणि सर्वांच्या दृष्टीने वाईट निर्णयत्या दिवशी ती पूर्ण एकटी होतीआणि त्या नंतर बऱ्याच वेळा एकटीच.. पण या सर्वांचा विचार तिने आधीच करून ठेवला होताचार वर्षांचा तो पाश शब्दशः झुगारून ती मोकळी झाली होती. 'झुगारूनया अर्थाने कि तिला त्या निर्णयापासून परावृत्त ती स्वताच जास्त करत होतीबंधनं, रूढी, चाली, धर्माधर्म यामुळे बटबटलेला समाज आणि त्या समाजाचा विचार करून तिने स्वतानेच तो विचार आजवर ढकलला होता. पण प्रत्तेकाच्या परिसीमा असतात - सहन करण्याच्या आणि ओलांडण्याच्याही. जेव्हा दोनही सीमा पार होतात तेव्हा काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागतो. आणि तिने तो निर्णय घेतला होता.
तिची नजर त्या हिरव्याशार डोंगरावर भिरभिरत होती. मनाला आसीम शांतता आणि डोळ्याला सुख मिळत होते. अर्धा एक तास गेला असेल, तिने पुन्हा एकदा टूरिस्ट कंपनीला फोन केला. यावेळी फोन उचलला. तिकडून एक सोज्वळ स्त्रीचा आवाज होता, त्या स्त्रीने उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि अर्ध्या तासामध्ये कार येण्याची व्यवस्था केली. तिथेच टपरीवर कॉफी घेवून ती जवळची काही पुस्तक चाळत बसली. अर्धा तास व्हायच्या आधीच तिची कार आली. समान सावरत ती कार मध्ये बसली, आज हवामान छान होते त्यामुळे ती एका तासातच अल्मोराला पोचली. 
तिच्या त्या रेसिडेन्शिअल हॉटेल मधल्या रुमच्या बाल्कनीतून पुढे दरीच दरी आणि डोंगररांगांचा पसारा दिसत होता. अजूनही वातावरण पहाटे प्रमाणेच आल्हाद दायक होते. स्टेशन वरच्या निसर्गापेक्षाही पेक्षाही जास्त मनमोहक इथला नजरा होता. ती फ्रेश होवून, बाहेर एक फेरी मारायला निघाली. भूरभुरते केस, काळी कमीज आणि शुभ्र पांढरी चुडी सलवार, गळ्यात कॅमेरा आणि खांद्यावर झोळीसारखी पर्स. तिची स्वारी निघाली. निघण्यापूर्वी तिने माहिती पत्रक घेतलेच होते. त्यात जवळच्या एका शंकराच्या मंदिराचा नंबर पहिला होता. आणि ते जवळ पण होते मग स्वारी तिकडेच निघाली. मंदिराच्या आवारात पोचल्यावर पहाते तो सगळीकडे असंख्य घंटा. इतक्या घंटा एकत्रित पणे तिने पहिल्यांदाच पहिल्या होत्या. तिथली एक प्रथा होती. भक्तगण आपल्या इच्छा किंवा आपली संकटं एका पत्रामध्ये लिहून ते पत्र मंदिरामध्ये टांगतात आणि जेव्हा त्यांचे मनोरथ पूर्ण होतील तेव्हा तिथे मंदिरात येवून घंटा बांधतात. आणि देवाने असंख्य लोकांच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या हे त्या घंटानवरूनच कळत होत. तिनेपण पटकन कागद काढून २-४ पान भरवली. शंभर एक इच्छा त्या कागदावर उतरवल्या. ते पत्र तिथे टांगलं. मंदिराच्या जवळच्या एका दुकानातून शंभर घंटा विकत घेतल्या आणि दुकानातल्या नोकराच्या मदतीने तिने त्या घंटा टांगून पण दिल्या. मंदिरातल्या पुजाऱ्याने तिला टोकल सुद्धा कि लग्गेच पत्र टांगून लग्गेच घंटा नाहीत बांधत. इच्छा पूर्ण झाल्यावर घंटा बांधतात. तिने लगेच त्याला उत्तर केल " पुजारीजी, सही कहा अपने. मगर मेरी तो इतनी इच्छाये भगवानने पुरी कि ही. और जो भी कूच बची कुची ही - वो तो पुरी होणेही वाली है. इसलिये मैने सब घंटाये अभी बांध ली. मुझे पुरा विश्वास ही कि मेरी सभी इच्छाये पूर्ण होगी और अगर कोई इच्छा पूर्ण नाही होती तो वो इच्छा गालात ही ऐसा मी समझ लुंगी." पुजारी बोले - "सही कहा बेटी. तुने एस जीवन को सही मी समझा है."

Thursday, February 23, 2012

चांदणं - ४

ती झाडाखाली बसलेली असते. 

कॉलेज भरायला अजून बराच वेळ असतो आणि अशावेळी त्या झाडाखाली बसून घोळक्याकडे बघून तिला तिच्या डायरीची पण भरवायला जाम मजा येते. अशीच नेहमीप्रमाणे ती त्या झाडाखाली बसलेली असते.
तो तिथून लांब असलेल्या कट्ट्यावरून तिला निरखत बसलेला असतो. तीच मग्न होवून डायरीमध्ये लिहिण तो न्याहाळत असतो. तसा लिहायचा नाद त्यालाही होताच, पण तिच्या इतका तो खोल कधी लिहायचा नाही. किंबहुना त्याच लेखन म्हणजे विडंबन कविता, फुटकळ विनोदी कथा यापलीकडे जायचं नाही. पण जेव्हापासून त्याने तिला ऐकल होत ना तेव्हापासून त्याला तीच लेखन म्हणजे खूपच भावलं होत. 
त्याला तिला भेटून बोलायचं होत पण हिम्मतच होत नव्हती. 
तिने चार पाच डायरीची पान भरवली होती एव्हाना. तिच्या मैत्रिणी आल्या तशी ती आवरून निघाली.  त्याचा आणि तिचा वर्ग वेगळा होता. तो पडला कॉमर्स चा विद्यार्थी आणि ती आर्टस ची.
त्याची आणि तिची पहिल्यांदा ओळख झाली ती पुरस्कार वितरण सोहळ्याला. बारावीचा निकाल लागला. ती कॉलेजमध्ये ७ वी आली होती. त्याला जेमतेम फर्स्ट क्लास मिळाला होता. त्या समारंभात त्याने धीर करून तिला जावून अभिनंदन केले होते. तेव्हा त्या दोघांची पहिली ओळख आणि भेट. तिने हसून त्याला प्रतिसाद दिला. पुढे काय करणार वगैरे थोडीफार बोलणी झाली आणि अशाप्रकारे त्या भेटीची सांगता झाली. पुढे भेटू केव्हातरी म्हणून एक आश्वासनही देईल गेल. पण ती भेट होण्याची काहीच शाश्वती नव्हती.
पुढे त्याने बी. कॉम. ला अडमिशन घेतलं. बी. कॉम च्या शेवटच्या वर्षाला असताना तो आणि त्याची मैत्रीण आभा यांची फार चं मैत्री जुळली होती. तो, आभा, भूश्या, संजय, श्रेयू आणि अगस्ती. धम्माल मजा करायचे. त्याच लेखन तर आताशा पूर्ण बंदच होत. पण तेव्हा पुरुषोत्तमच जाहिराती भिंतीवर लागल्या. तो आणि त्याच्या मित्र मंडळीनी पुरुशोत्तामचा घाट घातला. 
झाल त्यांची तयारी सुरु झाली. स्क्रिप्ट लिहायचं काम संजय कडे, डायलॉग लिहायचं काम त्याच्याकडे. कारण अजून कोणाला माहितीच नव्हत कि तो कधीतरी कथा-कविता लिहित होता ते आणि त्याने कोणाला काही संगीतालाही नव्हत. पण जेव्हा त्यांची कथा तयार झाली आणि संजय ने ती सर्वाना ऐकवली तेव्हा ती कोणाच्या मनाला टच होत नव्हती. काहीतरी गडबड होती पण कोणालाच कळेना. 
कथा होती कृष्णावर. पण त्यातला तोच तोचपणा लग्गेच जाणवत होता.
कथा कशी असावी यावर आता सर्वांची चर्चा होणार होती. सर्व जण जमले.
आभा - "स्टोरी अशी पाहिजे ना कि त्यामुळे प्रेक्षक एका वेगळ्याच वातावरणामध्ये जातील. आणि आपली सध्याची हि गोष्ट म्हणजे एकदम कॉमन आहे रे भूश्या . संजू तू काहीतरी वेगळ लिही ना जरा."
श्रेयू - "माझ्याकडे एक कल्पना आहे. अगस्ती ला तर मुझिक येत. आपण कृष्णाची मुझीकाल स्टोरी करूयात का? "
आभा - "अये यार नाही बर का. यात काही मजा नाहीये "
संजू - "ठीक आहे. मलाही कळतंय कि काहीतरी वेगळ करायचं. पण मला काहीतरी हिंट द्या ना राव तुम्ही लोक."
आभा - "आरे तू लेखक आहेस, आम्ही तुला काय हिंट देणार?"
अगस्ती - "मुझीकाल स्टोरी ची कल्पना तशी छान आहे. आपण मध्ये मध्ये कविता पण टाकू शकतो."
आणि अगस्तीच्या कविता या शब्दामुळे त्याला काहीतरी सुचत. पुढे काहीतरी चर्चा वाढून दुसर्या दिवशी पुन्हा उर्वरित चर्चा पुढे नेण्यासाठी भेटायचं ठरत.

तो घरी जातो. गेल्या गेल्या त्याच्या जुन्या डायर्या शोधतो. खूप शोध-शोध केल्यावर त्याला ते कवितेच पान भेटत. जेव्हा अगस्ती कविता टाकायची असा बोलतो, त्यावेळी त्याला तिच्या त्या पहिल्या कवितेही आठवण होते. आणि त्याच्या डोक्यामध्ये कहाणी फिक्स होते. घरी येवून तो तिचीच ती कविता शोधतो आणि त्याला सापडतेसुद्धा. 
तो स्टोरी लिहायला बसतो. स्टोरी आता कृष्णावर नाही तर राधेवर तो लिहिणार असतो.
४-५ तास पान खाराद्ल्यावर त्याच्या मनासारखी स्टोरी तयार होते. आणि तिची ती कविता तो त्यामध्ये टाकतो.
दुसर्या दिवशी त्याची ती नवीन स्टोरी सर्वाना इतकी आवडते कि पात्र, डायलॉग, स्टेज डेकॉर, कॉस्चुम सर्व काही फटाफट ठरून जात. श्रेयू राधेच पात्र साकारणार असते. त्यामध्ये एक खूप छान कन्सेप्ट त्याने टाकलेली असते ती म्हणजे - राधेची सावली. राधेच्या सावलीच पात्र अर्थात आभा करणार असते. सर्वाना ती कविताही खूपच आवडते. पण तो कोणाला सांगत नाही कि ती कविता त्याची नसते. 
झाल. सर्व तयारी होते. आणि स्पर्धेचा तो दिवस उजाडतो. त्यांचा नंबर सतरावा असतो. त्यांचा नंबर येतो. नाटक सादर करण्यापूर्वी, निवेदनामध्ये तो स्टोरी बद्दल थोडफार सांगतो -
"हि कथा आमच्या मनाला भावली म्हणून आम्ही इथे सादर करत आहोत. इथे आम्ही 'राधा' साकारणार आहोत. पण हि राधा काही कृष्णाची राधा नाहीये. हि राधा म्हणजे प्रत्तेक स्त्रीच्या मनातली आकृती आहे. इथे कुठेच कृष्ण नाहीये. का नाहीये? तर आपण नेहमीच राधेबद्दल बोलतो तेव्हा ती कृष्णाची राधा म्हणूनच बोलतो. किंवा तिच्या आयुष्यात कृष्णाशिवाय दुसरं काही नाहीये असाच आपण बोलतो. पण आज जी राधा आम्ही इथे सादर करत आहोत ती पूर्णपणे कृष्णाशिवाय. तिला तीच स्वतंत्र अस्तित्व आहे विचार आहेत, स्वप्न आहेत. हि राधा कदाचित पूर्वीच्या राधेशी मिळती जुळती नसेल. पण हि 'राधा' हि आजच्या प्रत्तेक स्त्रीच एक प्रतिबिंब असेल. आम्ही नाटकामध्ये एक कविता ऐकवणार आहोत. त्याबद्दल मला आधीच खुलासा करावासा वाटत आहे. ती कविता माझ्या बारावीच्या एका मैत्रिणीची आहे. आणि तिच्या परवानगीशिवाय आम्ही हि कविता इथे सादर केली आहे कारण तिच्याशी मला संपर्क साधता आला नाही. त्यामुळे तिची माफी मागून मी हे नाटक इथे सादर करत आहे. धन्यवाद."
नाटक संपले. टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट झाला. तो आणि त्याचे मित्र या प्रतिसादाने भारावून गेले. पडद्यामागे सर्व जण आपला मेक-अप आवरत असताना तिथे एक मुलगी आली आणि त्याच्याबद्दल विचारू लागली.
"तो आदित्य आहेत का इथे." 
श्रेयू - "नाही तो रेपोर्ट करायला गेला आहे. येईलच इतक्यात. तू?"
ती - "मी त्याची मैत्रीण आहे - जानव्ही. तुम्ही आदित्यला सांगा कि मी इकडेच आहे. आमचा नाटक सुरु व्हायला अगदी थोडाच वेळ आहे. तर मी आत्ता जाते. मी नंतर भेटेन नक्की."
श्रेयू - "ठीक आहे."
आणि ती लगबग करत निघूनही जाते.
तीच नाटक होवून जात. त्याच नाटक होत. श्रेयू गडबडीत तिचा निरोप त्याला सांगायचं विसरून जाते.
त्याला आणि त्याच्या ग्रुप ला ४ थ्या नंबरच बक्षीस मिळत. सर्व जण खूप खुश होतात. एकाच जल्लोष होतो.
तो आनंद साजरा करण्यासाठी ते सारसबागेमध्ये जमले. तिथे भेळ, रगडा खावून झाल्यावर त्यांचा घोळका बागेमध्ये विसावतो. तिथे त्या कवितेचा विषय निघतो.
आभा - "या कवितेबद्दल तू काही बोलला नाहीस आधी. आणि अजून एक गोष्ट, गडबडीमध्ये म्हणा किंवा या नाटकाच्या नादात एक गोष्ट मी बोलायचे विसरूनच गेले. तू खूप छान लिहितोस. आणि  आम्हाला आत्तापर्यंत कधी समजलाच नाही."
सर्व - "हो हो. हा आदी एकदम छुपा रुस्तम निघाला. खूपच भारी स्टोरी होती तुझी. आणि ती कवितेची भानगड काय आहे काय."
एवढ्यात श्रेयूला ती मुलगी आठवली.
श्रेयू - "ए आद्या, अरे एक पोरगी तुला भेटायला आली होती तिथे. ते नाटकाच्या गडबडीत मी सांगायचं विसरले. काय बर तीच नाव. हा जान्हवी. हो हेच नाव होत."
आदित्य - "जान्हवी ??? ती आली होती. कधी कुठे???" 
श्रेयू - "आपल नाटक झाल्यावर, आपण जेव्हा सर्व जण स्टेज च्या मागे होतो ना रूम मध्ये. तेव्हा ती आली होती. तू रेपोर्ट करायला गेला होतास तेव्हा. तिच्या कॉलेजच नाटक होत म्हणून ती गडबडीत निघूनही गेली."
आदित्य - "आर्रे यार, तीच माझ्या कवितेची लेखिका. जान्हवी. म्हणजे ज्या कवितेबद्दल मी बोललो होतो ती कविता माझ्या एका बारावीच्या मैत्रिणीने लिहिलेली आहे. नाटकामध्ये ती कविता घेण्याआधी मी तिचा म्हणजे - जान्हवीचा पत्ता शोधायचा प्रयत्न केला होता. पण माझा आणि तिचा काही संपर्क झाला नव्हता. आणि कोणाची कविता मला चोरून वापरायची नव्हती. म्हणून निवेदनामध्ये मी त्याबद्दल कल्पना दिली. पण तिची भेट मात्र हुकली."


* * *
पावसाची एक सर,
दवाचा एक बिंदू,
तशीच एक आठवण तुझी.
अलगद आणि हळुवार
अगदी तुझ्या कवितेसारखी.


Sunday, February 12, 2012

गोष्ट एका गोव्याची

'दिल चाहता है' पिक्चर रिलीज झाला होता तेव्हा दोन गोष्टी त्यांच्या नसानसात भिनल्या होत्या. त्यातली एक म्हणजे गोव्याची ट्रीप आणि दुसरी म्हणजे आमीर खानच आणि त्याच्या मित्राचं जेव्हा भांडण होत तेव्हा अमीर खान ऐकत असलेल गाणं (Desert  Rose by Sting ). त्यांचा ग्रुप कट्ट्यावर बसल्यावर हमखास ट्रीप चा विषय निघायचा आणि त्यामध्ये बीच वरच्या ट्रीप ला नेहमी प्राधान्य असायचं. आणि आपण आपल्या आई पप्पांना कस गंडवून ट्रीप ला जावू शकतो ह्याचे जास्ती प्लान ठरायचे. चार - पाच वर्ष झाली फक्त ठरवा ठरवीच सुरु होती आणि त्या प्लान ला मूर्त स्वरूप मिळायचे चान्स दिसू लागले. नशिबाने आई पप्पांना गंडवायची गरज भासली नाही कोणाला. पण कुठे ना कुठे फिरकी टाकावीच लागणार होती. आणि ती त्यांनी एकदम यशस्वीरीत्या टाकली होती. सर्व जण न पिताच एकदम सातव्या आस्मानावर कि काय म्हणतात ना तिथे होते. आणि खर तर त्यांना नशा येण्यासाठी असल्या खम्ब्यांची नाही तर मित्रांची गरज होती. एकदा ते सर्व जण एकत्र आले कि मग आधी हशा आणि मग त्या हर्षासुराची नशा. बाकी बाह्य गोष्टी म्हणजे क्षुल्लक होत्या. अजून एक त्यांचा नियम होता - "अभी नही तो कभी नही ." त्यामुळे मनात आल ते केल नही तर त्यांना अपचनाचा त्रास होतो. म्हणजे त्यापुढे जे काही होत ते त्यांना बिलकुल पचत नाही. तर अशा प्रकारे मजल दर मजल करत ५ वर्षांनंतर त्यांच्या त्या प्लान ला मूर्त स्वरूप आले होते.
* * *
त्यांचे पावलांचे तळवे त्या खाऱ्या पाण्यामध्ये भिजले आणि बऱ्याच वर्षांच्या तपस्येच फळ मिळाल्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये एक शांतात भरून आली. तो समुद्र सुद्धा त्यांच्या भेटीच्या स्पर्शाने एकदम शांत झाल्यासारखा मंद मंद लाटा किनाऱ्यावर सोडत होता. खूप आनंद किंवा संधान मिळाल्यावर त्यापुढे फक्त शांतता असते हेच भासत होत.
ती कुठल्यातरी लेखकाची शाळेत शिकलेली कविता त्यांच्यातल्या एका कार्टूनच्या  डोक्यात नक्कीच घुमली असेल - 
"माझ्या गोव्याच्या भूमीत
 गड्या नारळ मधाचे "..
त्या उनाड डोक्यांमध्ये आता हळू हळू वारे शिरत होते, एक भन्नाट वारे. 
४ दिवस बिनधास्त जगायचे, वाऱ्यावर उडायचे, लाटांवर तरंगायचे, आयुष्याला स्पर्श करतील आणि कोणत्याही दुखामध्ये हसवतील-धीर देतील अशा आठवणी जमा करायचे... 

* * *
त्यांचा घोळका त्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असणाऱ्या किल्ल्यावर मस्ती घालत होता. सूर्यास्ताचे भरपूर फोटो काढून झाले. सूर्य मावळला, आणि सगळीकडे एक जांभळी-गुलाबी-नारंगी झाक पसरली. निसर्ग हळू हळू अंधाराकडे चालू लागला होता. त्या उंच किल्ल्यावरून समुद्राचे पूर्ण दर्शन होत होते. दूर क्षितिजाच्या जवळ तपकिरी रंगाची उधळण करून तो भास्कर त्याच्या घरी निघून गेला होता. त्यांचा घोळका त्या किल्ल्यांच्या कड्यावर बसून हे डोळ्यात आणि मनामध्ये साठवण्याचा प्रयत्न करत होता. 
अंधार नेहमी वाईट वाटायचा, पण अंधाराकडचे मार्गक्रमण इतके सुरेख असू शकेल असे वाटले नव्हते. कदाचित हि पूर्णत्वाचे रंग आपल्याला याच वेळी अनुभवता येतात. हे रंग दिवसभरात कोणत्याच प्रहरी दिसणार नाहीत, पण या सांजवेळीच त्यांचा खेळ रंगलेला असतो.
जसा तो सूर्योदय असंख्य आनंदाचे किरण घेवून येतो, उत्साहाचे वातावरण घेवून येतो; अगदी तसेच हा सूर्यास्तदेखील एक वेगळीच शांतात आणतो. पूर्णत्वाची शांतता. तो जांभळा रंग कदाचित सूर्योदय कधीच आणू शकणार नाही.

पण यातली एकही गोष्ट त्या उनाड टाळक्या मध्ये आली नाही. असं म्हणतात कि आपण आनंदात असेल तेव्हा आपल्याला असं काही feel होत नाही. feel होण्यासाठी थोड तरी दुख लागत. 
आणि त्यांच्या डोक्यात तर फक्त वार भरलं होत - आनंदाच वारं. 

Monday, January 2, 2012

चांदणं - ३



ती कशी नेहमीच अलगद अलगद, हवेवार स्वार असते,
झुळूके ची दोर तिच्या हाती दिलेली असते,
कदाचित म्हणूनच  वेडे मन हे उगाच त्या वादळात उडी मारू पाहते..
तिच्या मनाच्या तळाशी जावू बघते..
ती अशीच अलगद अलगद, हवेवर स्वार असते..
बाकी कशाशी तिचे घेणे देणे नसते,
उगाच जगणे तिला मान्य नसते,
ती हसते तेव्हाही पाण्यावरती तरंग उमटते..
ती अशीच येते आणि झुळूक बनुनी जाते,
एका क्षणाची तिची मिठी त्या हवेत विरघळून जाते ...
ती त्याच हवेवर स्वार होवून अलगद निघून जाते ...
स्पर्श हवेचा आजही तिची कहाणी वदतो,
ती होती हा भासही मजला हुलकावणी देवून जातो,
ती कमळ आणि मग शब्द माझा भुंगा बनून जातो,
तिच्या भोवती गिरकी घेवून लांबूनच परतू येतो,
ती आपल्या पाकळ्या मिटून मूक निरोप घेते,
मजसोबत त्या हवेलाही ती वेड लावून  जाते...
ती मात्र अलगद अलगद स्वप्नात विरून जाते ....

तिची कविता संपते आणि प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बुजून जाते. त्या स्टेज वर जायच्या आधी आणि आत्ता कविता वाचून झाल्यावर तिच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास शिरला होता. तिच्या कवितेमधल्या नायिकेप्रमाणेच ती अलगद हवेवर स्वार झाली होती. आणि एक आकाशामध्ये उंच झेप घ्यायला सज्ज झाली होती. तो जल्लोष तिच्या रोमारोमामध्ये भरून उरत होता. टाळ्यांच्या त्या गजराला पूर्णविराम लागेपर्यंत तिने वाट पहिली. सगळीकडे शांत झाल्यावर तिने बोलायला चालू केल.

' मी, माझी मैत्रीण, माझी आई, माझी बहिण, मामी, अत्त्या, काकू, आजी, वाहिनी, शेजारची शालू, काकूंची माणिका, शाळेतल्या बाई, कॉलेजच्या टीचर - अशा कितीतरी रूपांमध्ये मी तिला पाहिलं आहे. माझ्या कवितेतल्या नायिकेला पाहिलं आहे. या सर्व जणींमध्ये आणि अशा अनेक जणींमध्ये अशीच एक परी लपलेली असते. जिला आयुष्य बेदरकार पणे जगायला आवडत. बेदरकार पणे म्हणजे उद्धटपणे नाही, किंवा उगाच फालतू नाही. हवेसोबत वाहत जाणं किंवा प्रवाहासोबत जाणं ज्याप्रमाणे असत त्याप्रमाणे.हे झाल कवितेच्या भाषेमध्ये. पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपण हवेसोबत कसे वाहू शकतो ? तर, त्यासाठी एक किस्सा सांगते. आमच्या इथे एक काकू होत्या. त्या अगदी असाच आयुष्य जगायच्या. त्यांच्या आयुष्याचे किस्से त्या नेहमीच सांगायच्या आणि तेही हसत हसत - मग ते सुखाचे असो कि दुखाचे. तर त्या काकूंची आई त्यांच्या लहानपणीच त्यांना सोडून गेली होती. सोडून गेली होती म्हणजे मेली नव्हती, तर तिच्या बाबांना सोडून गेली होती. त्या म्हणायच्या कि त्या वेळी त्या शेवटच्या कळवळून रडल्या, पण व्हायचं तेच झाल. त्यांची आई काही परत आल्या नाहीत. वडिलांची लाडकी असल्यामुळे त्यांना काही कमी नव्हत, पण आई सोडून गेली याच अपराधीपण त्यांनी कधीच आपल्या वडिलांवर येवू दिल नाही कि स्वताही त्यात अडकून पडल्या नाहीत. पुढे शाळा कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणेच दंग मस्ती करून आनंद लुटला. मग लग्न झाले. नवरा एकदम शामळू मिळाला, त्या मात्र एकदम जॉली. पहिली एक - दोन वर्ष त्यांची संसार, नवरा करण्यात गेली. पण नंतर त्यांना काही ते जीवन रुचेना. त्यांना नेहमी वाटायचं कि नवऱ्यान सोबत करावी, त्यांना आवडणाऱ्या गोष्टीमध्ये साथ द्यावी. पण तास झाल नाही. तास त्यांनी स्वताला बदललं. एका ठिकाणी पार्ट टाइम नोकरी चालू केली. गल्लीतल्या गणपतीपासून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची आयोजक म्हणून पाहण्यास सुरुवात केली, आणि आता त्या पूर्ण नगर पालिकेमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आयोजक आहेत. सोबत त्यांनी त्या वेळी गाण शिकायला चालू केल, मागच्या वर्षीच संगीताच्या सर्व परीक्षा पूर्ण पास झाल्या त्या. तबला, गिटार वाजवायला शिकल्या आणि एक-दोन कार्यक्रमामध्ये वाजवूनही झाल त्याचं. नवीन संगणक आले तेव्हा त्यांनी संगणकाच्याही परीक्षा दिल्या. आज त्यांच्याकडे त्यांचा स्वताचा नोटबुक आहे आणि त्या रोज वापरातातही. हे सर्व करताना त्यांनी त्यांच्या मुलानाही सोबत घेतलं. दोन मुलांसोबत त्यांनी कत्थक चे क्लास, गिटार चे क्लास केले. आज त्या ६५ वर्षांच्या आहेत त्यांना एका कार्यक्रमात विचारलं कि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप खुश कधी होता आणि कोणामुळे होता आणि तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता ? त्याचं उत्तर अगदीच पटणार होत. त्या म्हणाल्या कि मी खुश माझ्या मनामुळे होते आणि जेव्हा झाले तेव्हा दुखीसुद्धा मनामुळेच झाले. माझ्या यशाचं श्रेय आईपासून ते माझा खूप लाड केलेल्या वडिलांना, माझ्या नवऱ्यापासून ते माझ्या मुलांना, माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वच जणांना आहे. कारण माझ्या आयुष्यातल्या प्रत्तेक क्षणामध्ये कोणी न कोणी सामावलेलं होत आणि आहे. राहिली गोष्ट रागाची आणि लोभाची - तर मी जेव्हा खुश असायचे तेव्हा माझ्या आजूबाजूचे सर्व जन देवासारखे वाटायचे. पण जेव्हा मी दुखी असायचे तेव्हा सर्वांचा मला इतका राग यायचा कि एकेकाचा खून करुसा वाटायचा. पण या दोन्ही गोष्टी कायमस्वरूपी नाहीत. कायमस्वरूपी एकाच गोष्ट होती - मी माझ्या आयुष्यामध्ये अखंड समाधानी आहे. माझ समाधान कोण एका व्यक्तीवर अवलंबून नाहीये. किंवा कोणाच्या वागण्यामुळे माझ दुख नाहीये. जे काही तो फक्त एक मनाचा खेळ आहे. तो खेळ म्हणून हसत रडत खेळायचा कि युद्ध म्हणून जिंकण्यासाठी मरायचं-मारायचं ते आपणच ठरवायचं. खरच त्या काकुनी म्हंटल तर अगदी सामान्य आयुष्य जगलं आहे. पण अंमलबजावणी करायचं म्हंटल कि कळत. प्रत्तेकन स्वच्छंदी आयुष्य जगायला हव, कोणा एकावर आपला आनंद दुख विसंबून ठेवण्यापेक्षा आपल समाधान कशात आहे हे जाणून घ्यायला हव. बस मला एवढाच बोलायचं होत.'

अजून एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला, पण यावेळी त्या टाळ्यामध्ये एक विचाराची लाट जाणवली. त्यावेळी पहिल्यांदा त्याने तिला ऐकले होते, पहिले होते. त्याला एक क्षण असे वाटले कि - तिला हव असलेल आपण सर्व तिला द्यावं. पण परत त्यालाच लक्षात आलं. तिला हवं असलेल देणारे आपण कोण? ती स्वताच ते मिळवू शकते.