Wednesday, June 20, 2012

दारू देसी

सायकल वरून उतरून ती सायकल हातामध्ये पकडून गेटमधून आत आली. उडणारी ओढणी हळूच तिने सावरली. सायकल ला लॉक करून ती तिच्या कॉलेजच्या बिल्डींग च्या दिशेने चालू लागली. तो भला मोठा कॉलेजचा  पसारा पाहून तीच मन खूप खुश झाल. त्या बिल्डींग ची मोठी लाईन ती एक क्षण थांबून पाहू लागली. तिने तिचे डोळे झाकले.
कोलेजला जायच्या आदल्या दिवशी जी खूप सारी शोप्पिंग केली होती त्यातून एक फाडू टोप आणि स्कर्ट तिने  काढला. हातामध्ये मेटल, प्लास्टिक, फायबर च्या मिक्स केलेल्या रावडी बांगड्या, एकाच हातामध्ये. आणि दुसर्या हातामध्ये एक मोठ्ठ फ्रेन्डशिप band . तिच्या त्या बाईक वरून ऐटीत उतरून तिच्या कोलेजच्या बिल्डींग कडे ती जावू लागली. पहिल्याच दिवशी तिचा फक्कड ग्रुप जमला. खूप सारे गेम्स खेळले, प्रोग्राम ला डान्स केले. इवेन्ट्स लीड केले. चार वर्ष फुल धमाल करून भरपूर अभ्यासही तिने केला. कोलेजच्या शेवटच्या वर्षी तिला मस्तपैकी जॉबसुद्धा मिळाला. आणि तीच मन खूप खुश झाल. आणि तिने पटकन डोळे उघडले. ओढणी सावरत ती कोलेजच्या पायऱ्या चढू लागली.

कोलेज संपल, रिझल्ट लागला ; कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षी खूप तयारी करूनही तिला जॉब मिळाला नाही तसा तिचा कोलेज संपल्यावर जॉबसाठी शोध सुरु झाला. त्या दिवशी ती पहिल्या interview ला त्या काचेच्या आवरनातल्या बिल्डींगमध्ये गेली होती. काचेच्या लिफ्ट मधून सातव्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये जाताना तिला खालचे  लोक, साफसफाई करणाऱ्या बायका दिसू लागल्या. तिला खूप गम्मत वाटली. आता रोज आपल्याला या काचेच्या लिफ्ट मधून यायला भेटणार म्हणून ती खूप खुश झाली. interview झाला. ती ऑफिसच्या लॉबी मध्ये येवून रिझल्टची वाट पाहत बसली. तिथे बसल्या बसल्या तिला ऑफिसमध्ये येत-जात असलेले एम्प्लोयी दिसले. त्यांच्या गळ्यामध्ये ऑफिसचा आय डी कार्ड अडकवलेला होता. त्या ओफिसाच दार ती सर्व लोकं त्या गळ्यातल्या कार्ड नेच उघडत होती. आता तिला तिच्या रिझल्टच टेन्शनच येत होत. तेवढ्यात ओफिस्माढले सर आले आणि तिथे आलेल्या सर्वांचे रिझल्ट त्याने सांगितले. ती जड पावलाने तिथून निघाली. 
चार सहा महिने ती अशीच सगळीकडे interview साठी फिरत होती. त्या दिवशीसुद्धा ती अशीच एका छोट्याशा कंपनीमध्ये interview साठी गेली होती. टेस्ट झाली आणि त्या कंपनीच्या लॉबी मध्ये ती रिझल्ट ची वाट पाहत बसली होती. टेन्शन ने तीच मन खूप जड झाल्या सारख वाटत होत. तिथे समोरच कृष्णाची मूर्ती होती, त्या मूर्तीकडे पाहून डोळे झाकले.
ती त्या ब्लेझर मध्ये खूपच मस्त वाटत होती. भराभर पायऱ्या चढून तिने दुसरा मजला गाठला. जेवढी ती बाहेरून मस्त वाटत होती तेवढाच तिला आतूनपण खूप मस्त मस्त वाटत होत. ऑफिसमध्ये जायच्या आधी ती वॉशरूम मध्ये गेली, तिच्या पर्स मधून तिने परफ्युम काढाल आणि मस्त पैकी मारलं. थोडस पावडर लावून ती बाहेर आली. गळ्यातल्या आय डी कार्ड ने तिने ऑफिस च दार उघडल. ती आत गेली आणि सर्वाना गुड मोर्निंग म्हणत आपल्या क्युबिकल मध्ये जावून बसली. फायलींचा पसारा आणि भरपूर काम यात तिला वेळेच भानही राहील नाही. आज तिला जॉब मिळून एक महिना झाला होता आणि तिचा पगार होणार होता. ऑफिस वरून येताना ती जवळच्याच मॉल मध्ये गेली. पप्पांना वॉच, मम्मी ला साडी, बहिणीला ड्रेस, शेजारच्यांना वाटायला स्वीट्स, मित्र-मैत्रीणीना एक एक डेरी मिल्क अशी पहिल्या पगारातली शोप्पिंग करून घरी आली. घरी आईने पहिला पेढा देवापुढे ठेवून नमस्कार करायला सांगितला. तिने देवासमोर दिवा लावला, पेढा ठेवला आणि हा संपन्न दिवस दाखवला म्हणून देवाला आभार मानण्यासाठी डोळे झाकले. 
प्रार्थना करून तिने डोळे उघडले. तिला आता जरा हलक हलक वाटू लागल. घड्याळात तिने पाहिलं तर दीड तास वगैरे होवून गेला होता. अजून कोणीच रिझल्ट बद्दल काही सांगत नव्हत. पण टेन्शन ने जड झालेलं तीच मन आता बरच हलक झाल होत.     

तिला आज पाहायला येणार होते. ती तयार होत होती, तिची एक मैत्रीण तिला मेक-अप करून देत होती. आय लायनर लावून घ्यायला तिने डोळे झाकले.
बाहेर मुलगा, त्याचे आई वडील, भावू ,काका, काकू, आत्या सर्व जन आले होते. चहा पाणी झाल्यावर तिला बाहेर बोलावले. थोडे फार प्रश्न झाले, मुलाच्या आई ने तिला जवळ बसवून घेतले. अगदी अनौपचारिक पणे तिच्याशी बोलताना एकदम मुलाच्या आई म्हणाली, " ए तुला पिक्चर पाहायला आवडत का?" ती एकदम शॉक झाली. पण त्यानंतर तिची आणि त्या मुलाच्या आईची गट्टी जमली. तिने हळूच मुलाकडे पाहिले तर तोही तिच्याकडे पाहत होता. तिने गोड हसून प्रतिसाद दिला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी "killing smile " अस तिला सांगून गेले. तीच मन सुखावलं.
 जाता जाता त्या मुलाच्या आई ने तिचा फोन नंबर घेतला आणि म्हणाली, "लग्न जमल नाही तरी आपण दोघी पिक्चर पाहायला सोबत जावू बर का." आणि सर्व घर हास्य कल्लोळाने भरून गेल. तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणाली, "डोळे उघड आता, झाल लावून आय लायनर." तिने डोळे उघडले. ती तयार झाली. तेवढ्यात तिच्या बहिणीने येवून सांगितलं कि पाहुणे आले.
तिला अनुरूप वर पाहून मम्मी-पप्पानी लग्न ठरवलं. तिचा लग्नाचा दिवस उजाडला. सगळीकडे गडबड होती, त्या गडबडीत ती बुजून गेली होती. तिच्या मैत्रिणींची तिला आठवण येत होती. हातावरची मेहंदी तिने एकटीनेच एन्जोय केली होती. तिच्या मैत्रीणीना जॉब मुळे येता आलं नव्हत, कोणाला सुट्टी मिळाली नव्हती. नाही म्हणायला दोघीजणी अक्षतेच्या वेळी आल्या होत्या. लग्न लागल. जेवताना नवरदेवाने भरवला तेवढाच घास तिच्या पोटात गेला होता. विदाई च्या वेळी ती जेव्हा आई ला भेटायला आली तेव्हा आई आत्त्याला आहेर करत होती. ती तशीच उभी राहिली तिथे. पण ती पारदर्शक असल्याप्रमाणे त्या रूम मधले सर्व वावरत होते. तिच्या बहिणी पण लांब बसून होत्या. तीला अजूनच दाटून आल. तिने तसाच सर्वांचा निरोप घेतला. गाडीतून तिच्या आयुष्याच्या साथीदाराबरोबर जाताना ती खूप रडत होती. आणि कशासाठी हेच तिला कळत नव्हत. नवीन घरात प्रवेश केल्यावर लक्ष्मी पूजन वगैरे आटोपून ती तिच्यासाठी असलेल्या खोलीमध्ये गेली तिच्या करवलीसोबत. गादीवर पडल्यावर तिने डोळे झाकले. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी तिचा नवरा आणि ती दोघे फिरायला गेले. तेव्हाच मम्मी पप्पांचा फोन आला, त्यांना त्यांच्या लाडकीची आठवण येत होती. त्यांनी तिला २ मि. येवून भेटून जाण्याची विनंती केली पण तिच्या नवऱ्याने ते मान्य केले नाही. तिने उदासवाणे तिचे डोळे मिटून घेतले.
लग्नाचा दिवस उजाडला. तिच्या मैत्रिणी, तिची लाडली बहिण, आत्या मामा सर्व जन जमले होते. हळदीचा डाग तिच्या आवडत्या रूमलाला लागला म्हणून तिला वाईट वाटत होत. तिच्या नवऱ्याने तिच्याकडे आणि रुमालाकडे पाहून हळूच स्वताचा पांढरा शुभ्र रुमाल तिच्या हाती टिकवला.तिच्या मैत्रिणी जॉब मधून अगदी चार दिवस सुट्टी काढून आल्या होत्या, ती सगळ्यांसाठी खूप खास अशी होती ना. मेहंदीच्या दिवशी तिच्या मैत्रिणी तिला इतक्या चिडवत होत्या. ती लाजून चूर होत होती. सर्व जणींनी डान्स केला, तिनेही नंतर डान्स केला. तिची आई अगदी कौतुकाने लेकीकडे बघत होती. मेक अप साठी पार्लर मध्ये गेली होती तेव्हा तिच्या नवरोबाचा सारखा फोन येत होता. आणि तिच्या मैत्रीणीना अजून चेव चढत होता. 
नटून थटून नवरी पाटावर चढली. अंतरपाट पडला, तिने गोड हसून नवरोबाला हार घातला आणि आणि त्याने तिला. तिच्या जीवनाची गोड सुरुवात झाली होती. जेवताना तिच्या नवऱ्याने कौतुकाने पूर्ण ताट संपेपर्यंत खावू घातलं आणि तिनेही त्याला खावू घातलं. सर्व विधी आटोपले, निरोपाची वेळ जवळ आली. तिच्या आई ने तीच सुवासिनिच रूप डोळे भरून पाहून घेतलं. आनंदान पण अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्वांनी तिचा निरोप घेतला. नवरोबासोबत सासरी जाताना ती जेव्हा रडत होती, तेव्हा तीच हात तो अखंडपणे आपल्या हातात घेवून थोपटत होता. जणू काही त्याला म्हण्याचाय कि सखे हे तुझे अखेरचे अश्रू असतील, इथून पुढे तुझ्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त हसू असेल, सदाफुलीच हसू.तिने तिच्या नवीन घरात वाजत गाजतच प्रवेश केला. लक्ष्मी पूजन होवून ती तिच्या करवलीसोबत खोलीत आराम करण्यासाठी गेली. तेवढ्यात तिचा नवरोबा तिची कृष्णाची मूर्ती घेवून हजर झाला. तिला त्या मूर्तीकडे पाहून खूप बर वाटल. ती त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली आणि डोळे उघडले तेव्हा ती गाडीत होती नवऱ्यासोबत. ती आणि तिचा नवरा फिरून घरी गेले.  
क्रमशः 

Sunday, June 10, 2012

कृष्ण उवाच



"ती पुनः भेटली मला. वर्षानु वर्षांपूर्वी ती मला मीरा म्हणून भेटली होती. आणि त्याही आधी युगांपूर्वी राधा म्हणून. आणि आता ती वेडी पुनः भेटली. राधे इतकी आतुर नक्कीच नाही, ना मीरेइतकी थोरही नाही ती. पण तीच गोड हसू मात्र तसंच आहे. यमुनेच्या प्रवाहासारख. एकदा आली होती द्वारकेला, आणि तीच वेड मलाही देवून गेली. तेव्हापासून तिच्याविना काही सुचेना. खरतर त्या आधीच कधीतरी तिने मला तिच्या आयुष्याच सारथ्य दिलेलं होत, तिच्या स्वताच्याही नकळत. "
"मी एक पती झालो, भ्राता झालो, सखा बनलो, मित्र बनलो, पुत्र बनलो, मार्गदर्शक बनलो, सारथी झालो, वडील झालो, माझ्या राज्याला सांभाळायचे होते मला - एक राजाही होतो ना मी. सर्वांकडून आयुष्यभर प्रेम गोळा केले. माझ्या चुकानाही प्रजेने 'लीला' म्हणून पदरात घेतले. जे काही आधीच होते, तेच मी सर्वाना वाटल्याबद्दल मला खूप उच्च स्थान दिले. पण यात मी माझे स्वताचे काही केले नाही. जे काही होते ते इथेच होते आधीपासून, मी फक्त मार्ग दाखवला. म्हणून मला 'देव' संबोधले. पण या सर्वांमध्ये नक्कीच थोर राधा होती. तिने तर तिच्या जवळचे सर्वस्व दिले आणि त्यापलीकडेही जावून देत राहिली. माझ्याजवळ करण्यासारखे भरपूर होते, मी संसारात पूर्ण गुरफटून गेलो पण राधेजवळ तर फक्त माझ्या आठवणी होत्या, मीसुद्धा नव्हतो. पण त्या देवीने कधीच खंत म्हणून कशाची बाळगली नाही. नंतर आली ती 'मीरा' ! ती आली अन सारा आसमंत तिच्या ओवीनी उजळून गेला. तिची थोरता तर मलाही भारावून गेली. कधीकधी वाटत कि मी स्वतः बनून राधेला जवळ केल असतं, मीरेला आपल्या गाठी बांधल असतं तर खूप बर वाटल असत मलाही. "

"पण म्हणूनच कि काय ती वेडी पुनः भेटली मला. तिच्या ठायी मोह आहे, इच्छा आहेत , आकांक्षा आहेत. पण मला बोलते कशी, 'कृष्णा तूच सांग बर. जर मला मोह नसता तर तुझा मोह कसा धरला असता. मी स्वार्थी नसते तर स्वताच्या स्वार्थासाठी मी तुझ्यावर प्रेम कसे केले असते.' असे प्रश्न तिने विचारला सुरुवात केली कि मग माझी उत्तरे संपतात. आणि मग ती गोड हसू लागते. मग सारी सृष्टी या नारीच्या त्या हास्यापुढे फिकी पडते. मग वाटते कि प्रत्तेक प्रियकराने आपल्या प्रेयसीला असंच हसू दिल, एखाद्या पतीने त्याच्या रुक्मीणीला असंच सुखी केल तर माझ राधेला एकट टाकल्याच दुख थोड कमी होईल."

"मी तिला माझी गीता ऐकवायला गेलो एकदा तिला 'कोणत्या गोष्टीचा मोह धरू नये, मोहाने आपण संसारात अडकत जातो. फळाची अपेक्षा ना करता कर्म करत रहावे. सृष्टीतल्या सर्व गोष्टी अशाश्वत स्वरुपात आहेत, सर्वकाही नश्वर आहे म्हणून कशाच्या मोहात पडू नये.' तर लगेच तिचे उत्तर हजर, ' देवा, जर का चराचरात तू सामावले आहेस, जर का कणा-कणा मध्ये तुझे अस्तित्व आहे ; तर का त्या कणा-कणाचा मोह धरू नये? आणि फळाची अपेक्षा धरो वा ना धरो कर्म तर करायचेच आहे, पण फळ म्हणून जर तुझी इच्छा धरली तर ? ' आणि मग पुन्हा ती मला अनुत्तरीत करते. तिच्या ठायी राग आहे लोभ आहेत, स्वार्थ आहे; पण तरीही ती माझी आहे, माझा अंश आहे. तिच्या मनामध्ये मी भरून उरलो आहे. त्यामुळे तिच्या मनात येणाऱ्या प्रत्तेक मोहाचा, स्वार्थाचा मी साक्षीदार आहे. ती जेव्हा स्वताशी बोलते तेव्हा ती माझ्याशीच बोलत असते नकळतपणे. खरच ती वेडी आहे. जेव्हा मी तिच्या आणि तिने माझ्या गळ्यात माळ घातली तेव्हा मला वाटले खरच मी तृप्त झालो. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला तर तो माझ्या तृप्तीपेक्षाही कित्तेक पटींनी जास्ती होता. माझे समाधान तर राधेला प्राप्त केल्यासारखे होते, पण तिचा आनंद तर विश्वाच्या सर्वे सर्वा असलेल्या विश्व्कार्त्याच्या प्राप्तीचा आनंद नव्हता तर तिच्या प्रेमाचा, वेडेपणाचा विजय होता तो. ती कितीक सुंदर हळवी, रागीट. मग काय झाले, राग तर देवाधिदेव महादेवाला पण आहे. तिला भेटल्यावर वाटल कि गीता परत एकदा लिहावी, ज्यामध्ये खरच तिच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तिला देवू शकेल." 

" माझ्या प्रिय वेडीला प्राणाहून प्रिय बनवले आहे - या प्राणहीन कृष्णाने."


Wednesday, June 6, 2012

भूर्रर ....


तिचा नवरा तिला स्टेशन वर सोडायला आला होता. खर तर त्याला AirPort वर जायचं होत सोडायला, पण तिनेच मनाई केली होती. तिची ऑफिसची टूर होती - जर्मनी ला. ती स्टेशन वरून ट्रेन मध्ये बसली. AirPort वर पोचेपर्यंत तिच्या मनात हेच होत कि आपण जे करतोय ते चुकीच तर नाही न ? केवळ आपल्या इच्छेसाठी आपण ईशान ला फसवत तर नाही ना, पण लगेच तिच्या दुसऱ्या मानाने समजूत काढली कि, 'जरी तू तुझ्या मनाची इच्चा पूर्ण करत आहेस तरीही त्यात तुझ पाऊल कुठेहीवाकड पडणार नाहीये. तू फक्त आणि फक्त निर्भेळ आनंद घेण्यासाठी हे टूर च नाटक केलंस. त्यामध्ये कोणाला फसवण्याचा उद्देश तर येतंच नाहीये. '
'पण मग कोणी मला पाहिलं तर?' 'कस पाहील अगं, म्हणून तर तू जर्मनी निवडलस ना जायला.' 'पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याने कधीच नाही म्हंटल नसतं मला असा आनंद घ्यायला'
'पण मग त्यामध्ये मज्जा आली नसती ना. तुला तो आनंद कदाचित मिळाला नसता' 'पण तरीही कुठेतरी मनामध्ये वाईट वाटतंय' ' अगं वाईट वाटण्यासारख काहीच नाहीये त्यात, तू तिथून आलीस ना परत कि तुला वाटेल कि आपण केल ते बरोबरच केल. आणि पुन्हा कधीतरी दहा बारा वर्षांनी सांगून तक ना ईशान ला' 
शेवटी तिच्या एका मनाने दुसऱ्या मनावर विजय मिळवला आणि तिच्या मनातले सर्व वाईट विचार निघून गेले. खर वाईट विचार नेमके कोणते हेसुद्धा एक कोडंच होत तिच्यासाठी.
ती घरी ना सांगता जातीये हे वाईट होत कि ती स्वतासाठी जातीये हे वाईट होत तिलाच काळात नव्हत. म्हणूनच हा दोन मनांचा झगडा सारखाच चालू होता तिच्या मनात जेव्हापासून तिच्या मनात ती आईडिया आली होती.
*   *   *   *
त्या दिवशी ऑफिसवरून येताना  तिने तो कॉलेजचा ग्रुप पाहिला आणि मनोमन तिच्या कॉलेजच्या कट्ट्या पर्यंत जावून पोचली.  तो कट्टा, त्या खुसखुशीत गप्पा, ती कच्छी दाबेली, ती कैलास ची शेवपुरी, तो कॉलेज जवळचा टनेल. सगळ काही क्षणात तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेल होत. आणि नाही म्हणायला तिचा कॉलेजचा ग्रुप किंवा शाळेचा ग्रुप काही लीप वर्षाला नाही भेटायचे तर आठवड्या दोन आठवड्याला त्यांची एखादी भेट ठरलेली असायची. पण तरीही तो आठवड्याचा काळ म्हणजे सर्व मित्र मंडळीसाठी लीप यीअर सारखाच असायचा. कितीही भेटा, मज्जा करा तरी सर्वाना कमीच पडायचं.
आणि तिथेच तिला हि भन्नाट आईडिया सुचली. कि सर्वांनी मिळून जर्मनी ट्रीप करायची तेही न सांगता.  कोणालाही न सांगता. 
त्यानंतर वर्ष भरातच सर्वांच गलबत होवून जर्मनीचा प्लान तयार झाला होता. डॉन नेही केला नसेल इतका भारी प्लान केला होता सर्वांनी.
*  *  *  *
तीच स्टेशन प्लान मध्ये पहिलं होत. पुढच्या स्टेशन वरून निमो आणि बबली दोघीजणी चढल्या. पुढे दगडूशेठ बाबा, सिंघम, पांडा, सिल्क, जादूची मम्मी, एक्शन काका, लकी मावशी, एच के, मि. बिन सार्वजन ठरल्याप्रमाणे आपल्या आपल्या जागेवरून स्टेशन वर बसले.
ट्रेन AirPort जवळच्या स्टेशन वर थांबली. तशी सर्वजण आपल्या आपल्या सुटकेस घेवून उतरली. तसं AirPort जवळ होत, चालत जाण्या इतक जवळ. सर्वजण तिकीट खिडकी ला जावून तिकीट दाखवून आत शिरली. सर्वांनी  चेक इन केल आणि वेटिंग लॉबी मध्ये येवून बसले. आपापल्या घरी फोन करून AirPort वर पोचल्याचा निरोप दिला. ज्यांची बच्चे मंडळी होती त्यांनी त्यांना चोकलेट चे प्रोमीस करून फोन ठेवून दिले. तेवढ्यात सर्वांच्या फोन  वर मेसेज आला - "Gate No 7 ". सर्वांनी एकंच रिप्लाय केला "Roger that ".

सर्व जणांनी एकदम गलका केला गेट नंबर ७ वर.  आणि त्याचं विमान आकाशात झेपावल जर्मनी कडे. 
भुर्र्रर्रर ...... 


   

Tuesday, June 5, 2012

चांदणं - ६

आदित्य अवाक होवून जान्हवीच काम बघत राहिला आणि नाटक कधी संपलं याचा पत्तापण लागला नाही त्याला. नाटक झाल्या झाल्या तो पळतच जान्हवीच्या रूम कडे जायला निघाला. संजय ला ५ मिनिटात येतो म्हणून आदित्य जान्हवीला शोधात निघाला खरा पण वाटेत त्याला अभाच भेटली. आभा शी एक दोन शब्द बोलून ती काय बोलते आहे याकडे लक्ष न देता त्याने तिलाच विचारलं, " अग ती तुझी मुख्य नायिका कुठे आहे. तीच माझी बारावीची मैत्रीण. आपल नाटक झाल होत न, त्यामध्ये मी ती कविता घेतली होती त्या कवितेची लेखिका." अभाने प्रश्नांचा भडीमार करायच्या आधीच आदित्य ने सारा निबंध सुनावला. अभाने त्या कोपऱ्यातल्या खोलीकडे बोट केल आणि समोर बघते तो तो कधीच त्या रूम कडे झेपावला होता. आदित्य ला तिने इतका आसुसलेलं कधी पाहिलं नव्हता, पण जास्ती विचार न करता ती तिच्या रूम मध्ये आवरायला गेली.
आदित्य ने रूम च दार ठोठावल. जान्हवीने आतूनच कोण आहे, आत या म्हणून सांगितलं. 
तो आत गेला, जान्हवीने आरशातूनच आदित्य कडे पाहून एक मोठ्ठ स्मित केल आणि त्याला बोलायला वळली तेवढ्यात वळताना तिचा धक्का लागून तिथला काचेचा flower pot पडला. आणि ती हसायलाच लागली. आदित्य ला कळेना कि काय झाल नेमक, पण तिला हसताना पाहून त्याच्या मनात सहजच ओळी स्फुरल्या,

"आज अचानक मला कळेना,
उदय कुणाचा- सूर्याचा कि तुझा 
रात्र कोणाची चंद्राची कि तुझी 
मग तुझ्याच ठिकाणी उषःकाल अन 
कसा चांदण्यांचा पसारा ?
पावूस कोणाचा ढगाचा कि तुझा
पण तुझ्याच ओठी गडगडात सारा .. "

एकदम जान्हवीच्या आवाजाने तो जागेवर आला, "आरे सॉरी हं, माझ्याकडून हे नेहमीच घडत. मी आत्तापर्यंत शंभर एक flower pot तरी फोडले असतील, तरी मी सरांना सांगितलं होत कि माझ्या रूम मध्ये तुम्ही ते फुलांना कोंडून नका ठेवत जावू."
इतक बोलेपर्यंत आदित्य त्याच्या कवितेच्या विश्वातून पूर्ण बाहेर आला होता. आणि एकदम ओशाळून पण गेला होता, कारण जान्हवी कडून एकदम असा मोकळेपण त्याला अपेक्षित नव्हतं. 
तिची बडबड मात्र चालूच होती. 
"हो पण आदित्य राव , तुम्ही माझी कविता चोरली याबद्दल तुम्हाला शिक्षा तर झालीच पाहिजे. "
आदित्य एकदम गडबडून गेला आणि बोलू लागला - "अग मी त्यावेळी नाटक सुरु व्हायच्या आधी मुद्दामूनच प्रस्तावनेत सांगितलं होत तसं. पण तुला वाईट वाटल असेल तर मी .."
त्याच वाक्य मधेच तोडून ती लग्गेच बोलली "हो मला वाईट तर खूपच वाटलाय आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून तू पुढच्यावेळी येताना माझ्यासाठी चोकलेट चा मोठा बॉक्स आणि फोडायला एक flower pot घेवून ये ."
"पुढच्या वेळी ??" आदित्य एकदम बोलला. 
"का ?? आपण आता इथेच बाय करणारे का? आता आपण भेटत राहणारे. आणि हो तुझा फोन नंबर पण दे मला."
"घ्या जान्हवी बाई इथेच आहेत अजून. आम्ही मात्र पूर्ण गाव शोधून आलो. आणि तू इथे काय करतीयेस." इति अक्षय जान्हवीचा सहकलाकार आणि मित्रसुद्धा.
"अरे अक्षु हा आदित्य माझा बारावीचा मित्र. म्हणायला मित्र आत्ताचा जेव्हा त्याने माझी कविता चोरली तेव्हापासूनच. कारण कॉलेजमध्ये कधी आम्ही बोललोही नाही."
"आरे हाय आदित्य आणि please तू जानू कडे लक्ष देवू नकोस ती अशीच खेचत असते सर्वांची. खर तर तुझ्या त्या नाटकामध्ये तिची कविता ऐकून ती अशी वेड्यासारखी पळत सुटली होती स्टेज कडे. ती एकदम शोक झाली होती कि ती कविता तिला सापडली म्हणून."
"सापडली ??? म्हणजे ?", आदित्य.
"अरे तुला तिने सांगितलं नाही का अजून? तिच्या कविता संग्रहामध्ये ती कविताच तिला सापडत नव्हती."
"आरे अक्षय तो त्यानंतर आत्ता मला भेटलाय. पण अरे हो मी विसरलेच आदित्य तू कसा काय नाटक पाहायला? तुला नाटकांची आवड आहे का?"
"अग तुझ्यासोबत काम करते न ती आभा, ती माझी मैत्रीण आहे. आज तिच्यासाठी आम्ही आलो होतो आणि .."
"आणि काय ?", जान्हवी.
"अरे हो मी विसरलोच. मला आता लवकर गेल पाहिजे, कारण आज आम्ही कॉलेजची मित्रमंडळी खूप दिवसांनी एकत्र भेटलो आहोत आणि आम्ही आभा सोबत बाहेर जायचा प्लान केलाय. त्यामुळे मी आता निघतो." हे बोलता बोलताच तो रूम मधून बाहेर पडतो.
"ठीक आहे, पण भेट नक्की. बाय." जान्हवी.
"बाय जान्हवी आणि अक्षय तुलापण बाय."

त्यानंतर त्यादिवशी सर्व जणांनी खूप दिवसानंतर धम्माल केली. सर्व जनाच खूप खुश होते. एकटी आभा सोडून, तिला आदित्य ने जान्हवीला असा इतका वेळ जावून भेटलेल मुळीच आवडलं नव्हत. 
' आदित्य माझ्यासाठी आला होता न नाटक पाहायला मग तो इतका वेळ असा का तिच्याबरोबर गप्पा मारत होता कोणास ठावूक." हाच विचार पूर्ण वेळ आभा करत होती. पण नंतर मजा करता करता तीसुद्धा हे विसरली.

नंतर बरेच दिवस  आणि सर्वच जन आपल्या कामामध्ये बिझी होती. इतके कि कोणाचा कोणाला पत्ता नव्हता.
श्रेयू ला एका कंपनीत चांगला जॉब मिळाला होता, ती आता पार्ट टाइम कॉलेज करत होती. परीक्षेपुर्तच कॉलेजला जायचं होत तिला. 
संजय ला दिल्लीच्या एका विद्यापीठाचा कॉल आला होता सायाकोलोजी मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी, त्यामुळे तो तिकडे जायची तयारी करत होता.
अगस्ती च्या पी एच डी च पाहिलंच वर्ष होत, पण तो खूपच नेटाने अभ्यास करत होता. त्याला ऑस्ट्रेलियामधून तिथे त्याच पी एच डी पूर्ण करण्यावाषयी विचारणा झाली होती.
आदित्य मात्र मागे पडत होता. CA च्या पहिल्या परीक्षेमध्ये नापास झाला होता. अभासुद्धा मुंबई ला शिफ्ट झाली होती, आताशा तिला मराठी हिंदी मालिकेमध्ये काम करण्याविषयी विचारणा झाली होती आणि एका मराठी मालिकेमध्ये ती कामही करू लागली होती. तिने नाटक कारण सोडून दिल होत. पण ती महिन्याचा एका रविवारी खास आदित्य ला भेटण्यासाठी घरी येवून जायची. हल्ली तिला आदित्य बद्दल वेगळ फिलिंग येत होत. तिलाच काळात नव्हत, पण तो आता मित्रापेक्षाही जास्त कोणीतरी बनू लागला होता. आदित्य मात्र त्याच्या अपयशामुळे सर्वांपासून दूर राहू लागला होता. 
आदित्य ने आता नोकरी शोधायला चालू केल होत. 
पावसाळा सुरु झाला होता. एके दिवशी असाच क्लास वरून रात्री उशिरा येताना आदित्य बस स्टोप वर थांबला होता. एकदमच पावसाला सुरुवात झाली, आधी रिमझिम आणि दहा पंधरा मिनिटातच धो धो पडायला लागला होता. तेवढ्यात दूरवरून कोणीतरी पळत पळत स्टोप कडे येताना त्याला दिसलं. आदित्य पूर्ण भिजला होता पण बस येवूपर्यंत त्याच्याकडे दुसरा पर्यायाच नव्हता.
ती पळत येणारी व्यक्ती आता दृष्टीक्षेपामध्ये आली होती. आणि आदित्यने चमकून पाहिलं तर ती जान्हवीच होती. 
ती आली स्टोप वर आणि स्टोप च्या एका कोपऱ्यात आडोशाला उभी राहिली. तीच लक्ष नव्हता आदित्य कडे. स्टोप वर अजून एक दोन जन होते. 
आदित्य तिच्या जवळ जावून थांबला आणि बोलला " सॉरी मी चोकलेट आणि flower pot नाही आणलाय. " आणि जान्हवीने आश्चर्य भरल्या नजरेने शेजारी पाहिलं.
दोघेही एकदमच बोलले " कुठे आहेस तू ??"
जान्हवीने हात करून आदित्य ला थांबवलं आणि तिने बोलायला सुरु केल , "आरे काय हे कुठे होतास इतके दिवस. मी नाटक सोडलं आणि त्यामुळे अभाकडून तुझा पत्ता घ्यायचा सुद्धा राहिला. तू तेव्हा फोन नंबर द्यायाचाही विसरून गेलास. .."
आणि आदित्य ला कळलं कि आता हिची बडबड काही थांबणारी नाहीये. आणि त्याला ती थांबू नये असंही वाटू लागल. कारण त्या दिवशी त्याने चार पाच ठिकाणी नोकरी साठी interview दिले होते सगळीकडे निराशा होती. आणि मग त्यामुळे त्याच लक्ष क्लास मधेही लागत नव्हत. आणि त्याला जान्हवी दिसली इथे, त्याला इतकं बर वाटल कि बस्स तिची बडबड ऐकत राहावी. 
आणि जान्हवी होतीच तशी. बडबडी.
त्या पावसामध्ये आदित्यला पुन्हा काही ओळी सुचल्या -
"मुसळधार पावूस आहे कि हिची बडबड
मलाच उमजेना,
ठाव मनीचा घेत 
तिचे शब्द मनातून परत फिरेना,
"
आणि आदित्य एकदम थबकला. कारण त्याला जाणवलं कि जान्हवी जेव्हा जेव्हा समोर येते तेव्हा तेव्हा तिच्यासोबत ती हि कविता आणि कवितेचे शद्बही घेवून येते.

एव्हाना पाऊस निवळला होता. रस्त्यावरच्या दिव्यात ते रात्रीचे रंग सुरेख दिसत होते. रस्त्यावरचे दिवे जणु पावसात धुतले गेल्यामुळे अजून शुभ्र प्रकाश फेकत होते.