Wednesday, August 10, 2011

Revenge Day 1 - Happy Friendship Days !!!


[ I am going to take revenge with my near and dear friends by writing something for them. Here we go ... with Day 1]

बस्स या राखी पौर्णिमेला सर्व मुलांना राख्या बांधायच्याच. बर झाल हा friendship  day  रविवारी येतो ते. तयारी झाली, आमचा ग्रुप म्हणजे धींकच्याक ग्रुप ! सर्व काही ठरवणार, अर्थाचे अनर्थ काढणार, drama  queens  सर्व ठासून भरलेला. मुलींच्या सर्व ग्रुप ने संगनमताने ठरवलं कि यावेळी सर्व मुलांना राख्या बांधायच्या. त्याप्रमाणे  मुलींच्या  मोनीटर ने मुलांच्या मोनीटर ला सांगितलं कि उद्या सर्वांनी शाळेमध्ये हजार राहा, आपण रक्षाबंधन साजरा करणार आहोत. मुलांचा मोनीटर ठीक आहे म्हणाला. झाल आम्ही आतुरतेने वाट पाहत असलेला तो दिवस आला - त्या दिवशी मधल्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व मुलांना राख्या बांधल्या. मुली ३२ आणि मुल ३४.
आम्ही आमच मिशन पूर्ण केल म्हणून फारच खुशीमध्ये होतो. कि २-३ दिवसात आमच्या कानावर आलं कि, मुलीना फक्त राखी भेट वस्तू पाहिजे होत्या म्हणून त्यांनी राखी पोर्णिमा साजरी केली असा काही मुल म्हणत आहेत.
झाल, आम्हाला तर कारणच पाहिजे होत भांडण करायला. झाल सर्व मुलीनेमध्ये सूचना गेल्या - आपापल्या भेट वस्तू उद्या शाळेमध्ये घेवून या, आपण सर्व परत करून टाकणारे. त्याप्रमाणे सर्व मुलीनी आपापल्या भेटवस्तू आणल्या, एका पिशवीमध्ये गोळा झाल्या आणि मुलींची  मोनीटर मुलांच्या मोनीटर कडे गेली आणि साऱ्या वस्तूंची पिशवी त्याला देवून टाकली. ती पिशवी बघून मुलांना चेव चढला, त्यांनी ती समोरच्या टेबलावर ठेवून दिली. आता इकडून मुली ती पिशवी मुलांकडे ढकलत आहेत, तिकडून मुल ती पिशवी मुलींकडे ढकलत आहेत. झालं, भांडण पेटलं. वादावादी झाली. आणि राखीच्या (सावंत नव्हे, पोर्णिमा म्हणजे राखी पोर्णिमा ) निमित्ताने एकत्र आलेले भारत पाक परत  विभक्त झाले.
वर्गातला मुलगा समोर आलं कि मुली वाट बदलून चालू लागल्या.
दिवसावर दिवस जात होते आणि हे शीत युद्ध काही संपायच नाव घेईना. तसं हे भारत पाक युद्ध सर्व शाळेमध्ये माहिती होत. शिक्षक तर फार रागवायचे, पण आमच्या चित्रकलेच्या बाईनी ठरवलं कि या युद्धाची समाप्ती केली पाहिजे. हा वर्ग जर एकत्र आलं तर तो नक्कीच खूप चांगला किवा सर्वात चांगला असा ठरणार होता हे त्यांना खूप आधीच कळाल होत.
म्हणून त्यांनी चित्रकलेच्या तासाला वाटाघाटी करायचं ठरवलं. एक एक करून त्या सर्व मुलांच्या आणि मुलींच्या तक्रारी ऐकत होत्या. पण तक्रारी जेव्हा सांगितल्या जात होत्या तेव्हा, आम्हाला कळत होत कि या तक्रारी काही इतक्या मोठ्या नाहीत कि आम्ही मुला-मुलीनी इतका भांडल पाहिजे. आणि या शिखर परिषदेमध्ये भारत पाक पुन्हा एकत्र आले. त्यानंतर खेळांच्या स्पर्धेच्या निमित्ताने हे धागे अजून मजबूत झाले. जेव्हा आमचे मैत्रीचे धागे घट्ट व्हायला चालू झाले होते तेव्हा परत एकदा ठिणगी पेटली, ती सीमा रेषेवरून. आमचा बेंच मुलांनी ओढून नेला होता. खर काय ते देवालाच माहिती, पण आमचा मधल्या ओळीचा दुसऱ्या नंबरचा बेंच मुलांच्या ओळीमध्ये आम्हाला दिसला. आम्ही पेटून उठलो, तो बेंच आम्ही ओढून आणला परत आमच्या ओळीमध्ये.
शाळा भरली, आणि यावेळी मात्र मुलांनी हद्द केली. आमच्या दोन मैत्रिणी बेंच वर बसलेल्या असताना त्यांनी बेंच उचलायचा प्रयत्न केला. प्रयत्न काय, उचललाच होता. एक क्षणभरासाठी सर्वांचे ठोके चुकले होते कि आता त्या दोन मुली त्यावरून खाली धपकन आदळणार. पण हुश.. वाचल्या. अगदी वेळीच तो बेंच हवेतून जमिनीवर आल्याने त्या दोघीचा पात (जसे कि उल्कापात, हवेतून उल्का खाली पडणे) होता होता थांबला.
बस्स यावेळी मात्र आम्ही ठरवून टाकल होत, कि आता कध्धी म्हणजे कद्धीच मुलांशी बोलायचं नाही. आणि ज्वाला मुखी परत एकदा धुमसायला चालू झाला.
आता या वेळी कोणी काहीच करू शकणार नव्हत हे मात्र निश्चित झालं होत.
असेच शाळेमधले दिवस संपले आणि send -off ची तयारी चालू झाली. बस्स तेव्हा आणि शेवटच आम्ही एकत्र येणार असं सर्वांनाच वाटल होत. तेव्हा  कोणाला काय माहिती होत कि राखी पोर्णिमा साजऱ्या करणाऱ्या या मुली पुढे जावून friendship day ला  याच मुलांसोबत dance करतील, त्यांच्यासोबत मैत्रीच्या आणा भाका घेतील, आणि याच मुलांशी परत कधीही बोलायचं नाही असा प्रण घेणाऱ्या या पुढे त्यांची ओळख जिवलग मित्र म्हणून करून देतील.
बर झालं तेव्हा भांडलो, नाहीतर आज कदाचित इतके घट्ट धागे जुळले नसते.


[Disclaimer -  'All the characters, incidents and places in this story are fictitious. Resemblance to any person living or any incident or place is purely coincidental.'
इस कथा की सभी पात्र काल्पनिक है, इसका किसी भी जीवित व्यक्ति से और घटनासे कोई संबन्ध नहीं है. अगर कोई साधर्म्य दिखाई दे तो वो सिर्फ एक योगायोग समजावा.  धन्यवाद ! ]

2 comments:

  1. Best Lines Pd....ek nooo...lay bhari....
    " तेव्हा कोणाला काय माहिती होत कि राखी पोर्णिमा साजऱ्या करणाऱ्या या मुली पुढे जावून friendship day ला याच मुलांसोबत dance करतील, त्यांच्यासोबत मैत्रीच्या आणा भाका घेतील, आणि याच मुलांशी परत कधीही बोलायचं नाही असा प्रण घेणाऱ्या या पुढे त्यांची ओळख जिवलग मित्र म्हणून करून देतील.
    बर झालं तेव्हा भांडलो, नाहीतर आज कदाचित इतके घट्ट धागे जुळले नसते."

    ReplyDelete
  2. प्रत्येक शाळेत असच काहीतरी होत होतं माझ्या मते...
    वाचून मलाही शाळेतले ते भांडणं आठवले...
    Disclaimer काढला तरी काही हरकत नाही..
    ह्यातला एकही वाक्य आता भांडणासाठी कारणीभूत ठरणार नाही.. इतकी तर चांगली मैत्री झालीये आता...

    आणि ह्या दोन ओळींचा "timing " म्हण किंवा त्या वेळेस सुचण्याची कल्पना म्हण... लई लई लई जास्त भारी होती... २५ हजार हून जास्त भारी....

    " राखीच्या (सावंत नव्हे, पोर्णिमा म्हणजे राखी पोर्णिमा )"
    "बेंच हवेतून जमिनीवर आल्याने त्या दोघीचा पात (जसे कि उल्कापात, हवेतून उल्का खाली पडणे) होता होता थांबला."

    ReplyDelete